Youth Abandoning Condoms saam tv
लाईफस्टाईल

'या' कारणाने तरूण कंडोमचा वापर करत नाहीत; WHO च्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Youth Abandoning Condoms: जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत एक सर्व्हेक्षण केलं होतं. या अहवालात असं म्हटलं आहे की, जगभरातील तरुणांमध्ये कंडोमचा वापर कमी झाला आहे. दरम्यान तरूणांची ही बाब फार चिंताजनक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कंडोम हा शब्द आता आपल्या समाजात टॅबू राहिलेला नाही. कंडोमच्या वापराने असुरक्षित शारीरिक संबंधांमुळे होणाऱ्या एड्ससारख्या जीवघेण्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कंडोमचा वापर करावा, असा सल्ला नेहमी देण्यात येतो. मात्र असं असून देखील तरुण कंडोम वापरणं टाळतायत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालातून ही धक्का बाब समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत एक सर्व्हेक्षण केलं होतं. या अहवालात असं म्हटलं आहे की, जगभरातील तरुणांमध्ये कंडोमचा वापर कमी झाला आहे. दरम्यान तरूणांची ही बाब फार चिंताजनक आहे.

तरूणांमध्ये का कमी होतोय कंडोमचा वापर?

तरुणांमध्ये कंडोमचा वापर कमी होण्याचं कारण पोर्नोग्राफी किंवा OnlyFans सारखे प्लॅटफॉर्म किंवा natural family planning हे सांगण्यात आलं आहे. ग्लोबल युथ ऑर्गनायझेशनमधील सेक्सुअल हेल्थ टीचर सारा प्रॅट यांनी सांगितलं की, 'काही मुलं कंडोम वापरत नाहीत कारण त्यांना ते पोर्न व्हिडिओंमध्ये वापरलं जात असल्याचं दिसत नाही.'

सारा प्रॅट पुढे म्हणतात 'लैंगिक शिक्षणाचा अभाव हे देखील तरुणांमध्ये कंडोमचा वापर कमी होण्यामागील एक कारण आहे. मुळात तरुणांनी हे समजून घेतलं पाहिजे की, त्यांनी एसटीआय पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कंडोम वापरला पाहिजे.

कोणत्या भागात कंडोमचा वापर झाला कमी

काही काळापूर्वी डब्ल्यूएचओने युरोप आणि मध्य पूर्वेतील ४२ देशांमध्ये सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये 15 वर्षे वयोगटातील 2,42,000 किशोरवयीन मुलांना कंडोमबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेत्या या सर्वेक्षणात असं आढळून आलं की, शेवटच्या वेळी शारीरिक संबंध ठेवताना कंडोम वापरणाऱ्या मुलांची संख्या 2014 मध्ये 70% वरून 2022 मध्ये 61% वर आली आहे.

मुली करतात कंडोमचा वापर?

या रिपोर्टमध्ये मुलींचीही माहिती देण्यात आली आहे. ज्या मुलींनी शेवटचा कंडोम किंवा गर्भनिरोधक गोळ्या वापरल्या होत्या त्यांची संख्या ६३% वरून ५७% वर आल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे एकंदरीत शारीरिक संबंध ठेवताना मुली इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळ्या घेणं टाळत असल्याचं समोर आलं आहे.

या WHO सर्वेक्षणात असंही आढळून आलं आहे की 2014 ते 2022 पर्यंत, 15 वर्षे वयोगटातील 26% मुलींनी शेवटच्या वेळी शारीरिक संबंध ठेवताना गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला होता. लोअर मिडल क्लास कुटुंबातील 33% किशोरवयीन मुलं कंडोम वापरत नाहीत. उच्च वर्गीय कुटुंबांमध्ये ही संख्या 25% पर्यंत आहे. डब्ल्यूएचओने तरुणांना शारीरिक संबंध ठेवताना कंडोम वापरण्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरून लैंगिक आजार टाळण्यास मदत मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT