सकाळच्या 'या' सवयी तुमच्या किडनीला ठेवतील नेहमी निरोगी

Surabhi Jayashree Jagdish

किडनीचं कार्य

अशा काही निरोगी सवयी आहेत ज्या तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करतात. शिवाय या सवयींमुळे किडनीचं कार्य लक्षणीयरीत्या सुधारू शकतं.

किडनीचं आरोग्य

योग्य हायड्रेशन, संतुलित जेवण आणि ताण व्यवस्थापन यासारख्या साध्या सवयींमुळे तुमच्या किडनीचं आरोग्य वर्षानुवर्षे उत्तम राहण्यास मदत होऊ शकते.

पाणी प्या

शरीराला रिहायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. यावेळी विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि किडनीच्या योग्य कार्याला समर्थन देण्यासाठी एका ग्लास पाण्याने दिवसाची सुरुवात करा.

नियमित व्यायाम करा

रक्ताभिसरण वाढवण्यासाठी, किडनीवरील ताण कमी करण्यासाठी आणि एकूण किडनीच्या आरोग्याला बूस्ट देण्यासाठी स्ट्रेचिंग, योगा किंवा जलद चालणं असे हलके व्यायाम करा.

योग्य पदार्थ खा

जळजळ कमी करण्यासाठी आणि किडनीच्या चांगल्या कार्यासाठी नाश्त्यात बेरी, हिरव्या भाज्या आणि ऑलिव्ह ऑइलसारखे पदार्थांचा समावेश करा.

​संतुलित नाश्ता

तुमच्या किडनीचे पोषण करण्यासाठी फळं, धान्य आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेला नाश्ता करा.

हर्बल टी घ्या

हर्बल टी पिण्यावर भर द्या. जी किडनी डिटॉक्सिफिकेशनला मदत करण्यासाठी आणि किडनीच्या कार्याला चालना देण्यासाठी मदत करते.

ताजमहालच्या चारही बाजूंना तुळशीची रोपं का लावली आहेत? 'हे' आहे खरं कारण

taj mahal | saam tv
येथे क्लिक करा