Surabhi Jayashree Jagdish
ताजमहालपासून ५०० मीटर अंतरावर ताज नेचर वॉक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
जगातील ७ आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाभोवती तुळशीची रोपं लावण्यात आली आहेत.
ताजमहालाभोवती तुळशीची रोपे लावण्यामागे एक मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे.
तुळशीमध्ये युजेनॉल नावाचं सेंद्रिय संयुग असतं, जे वायू प्रदूषण कमी करण्यास मदत करते.
ताजमहालला प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी सुमारे 80,000 तुळशीची रोपं लावण्यात आली आहेत.
तुळस कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड यांसारखे विषारी वायू शोषून घेते.
तुळशीच्या रोपातून उत्सर्जित होणाऱ्या ओझोन आणि ऑक्सिजनमुळे हवा स्वच्छ होते. त्याचप्रमाणे तुळशीच्या वनस्पतीतून बाहेर पडणारा ओझोन वायू सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करतो.
तुळशीमध्ये असलेलं युजेनॉल सेंद्रिय संयुग डास, माश्या आणि कीटकांना दूर करते.