Reading Saam Tv
लाईफस्टाईल

Reading: अवांतर वाचनाला सुरूवात करायचीय?मग वाचा ही ५ पुस्तके

Read These Five Books: आयुष्यात वाचन हे खूप महत्त्वाचे असते. वाचनामुळे आपल्याला माणसं, वेगवेगळ्या ठिकाणांची, गोष्टींची परंपरांची माहिती मिळते. जर तुम्हाला अवांतर वाचन करायचे असेल तर ही पाच पुस्तके नक्की वाचा.

Mruga Vartak

अवांतर वाचनाचे महत्व आपण सारे जाणून असतो परंतु काही ना काही कारणाने आपले वाचन लांबणीवर पडत असते. मग ते काहीही असो. कामाच्या व्यापामुळे किंवा वाचनासाठी एका ठिकाणी सलग न बसता येण्याची सवय, पुस्तकांबद्दल फारशी माहिती नसणं अशी अनेक.. आज या लेखातून तुम्हाला अशा ५ पुस्तकांबद्दल सांगणार आहे, ज्यापासून तुम्ही अवांतर वाचनाची सुरूवात करू शकता.

  • नाच गं घुमा - हे पुस्तक माधवी देसाई यांचे आत्मकथन आहे. भालजींच्या कन्या आणि सुप्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या त्या पत्नी. एवढे असूनही त्यांच्या वाटेला आलेला भोगवटा कुणा निराधार स्त्रीलाही येउ नये ईतका कठीण असा. गोव्यासारख्या समृद्ध भुमीत सासर तर कोवाडच्या ईनामदार वाड्याच्या त्या सून. भालजींसारख्या सिनेसम्राटाच्या त्या कन्या असून आयुष्याचा अर्धाअधिक कालावधी त्यांनी हलाखीत व्यतीत केलाय..

  • जीएंची पत्रवेळा - जी ए कुळकर्णी तसे पहायला गेले तर ईंग्रजीचे प्राध्यापक. परंतु, त्यांच्या मराठी कथा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथांपेक्षा त्यांची पत्रं जास्त गाजली. सुनिता देशपांडे, भटकळ आणि ग्रेसांसोबतची त्यांची पत्रवेळा प्रसिद्ध आहे. या पुस्तकात कवी ग्रेसांना आणि त्यांची लेक मिथिला यांना त्यांनी पत्र लिहीलीत. हे दोघे केव्हाच भेटले नाहित पण २ दशकांनंतरही हा पत्रव्यवहार कायम राहिला.

  • आता मव्हं काय - देविदास तारू यांचे हे आत्मकथन. शाळा सोडून बरेच दिवस झाले ते उनाडपणा करत फिरत. वस्तीतल्या लोकांनी त्यांना टाळायला सुरूवात केली होती. अशात आत्मविश्वास हरवून बसलेले देवीदास एका प्रश्नावर अडतात आणि त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली.

  • अक्करमाशी - अत्यंत दारिद्र्यामध्ये शरणकुमार लिंबाळे यांचे बालपण गेले. आई झोपडीत तर बाप माडीच्या घरात, अशी स्थिती होती. सवर्ण (लिंगायत) वडील आणि अस्पृश्य (महार) आईच्या पोटी ते जन्मले, यातून जन्मलेल्या वेदना या आत्मकथनात विस्ताराने येतात. याचे अजूनही २ भाग आहेत. राणीमाशी आणि पुन्हा अक्करमाशी.

  • उभयान्वयी अव्यय - उभयान्वयी अव्यय’ या चंद्रकांत खोत यांच्या कादंबरीत अश्लीलता, किंवा बोल्डपणा वगैरे आहे असं म्हणतात. पण त्यातच खरं त्यांचं आयुष्य व्यापून राहिलंय. त्याचा गरीब घरातला मुलगा ते कारकून ते लेखक ते मेल प्रॉस्टीट्युट हा प्रवास जर कथानकाच्या अंगाने पाहिला तर तसा विलक्ष्ण नाही मात्र त्याचं विश्व हे कथनकापेक्षा इथे समाजाच्या समोर येणं अधिक महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT