Payment Methods Saam Tv
लाईफस्टाईल

डेबिट- क्रेडिट कार्डने पेमेंट करताय? तर मग नियम वाचा!

जर तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डधारक असाल, तर तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की कोणत्या परिस्थितीत तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरू शकत नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जर तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डधारक असाल, तर तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की कधी तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरू शकत नाही. हा नियम आंतरराष्ट्रीय व्यवहार (International Transactions) किंवा पेमेंटशी संबंधित आहे. भारतीय कायद्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम डेबिट किंवा क्रेडिट कार्ड विशिष्ट प्रकारच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर प्रतिबंधित आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियम सांगतो की, हे निर्बंध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट, 1999 (FEMA) अंतर्गत आहेत. यामध्ये, परकीय चलन व्यवस्थापन (Current Account Transaction) नियम, 2000 चा नियम देखील आहे ज्याला FEMA करंट अकाउंट रुल्स (FEMA Current Account Rules) म्हणतात.

डीएसकेचे लीगल भागीदार अविनाश कुमार खरद यांनी सांगितले की, FEMA चालू खाते नियमांच्या शेड्यूल 1 मध्ये प्रतिबंधित असलेल्या व्यवहारांबद्द सांगितले आहे. यामध्ये बंदी घालण्यात आलेली संपूर्ण यादी देण्यात आली आहे. हे असे व्यवहार आहेत जे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने करता येत नाहीत. ते म्हणतात, परदेशात ज्या वस्तूंवर बंदी आहे, म्हणजेच ज्या काही वस्तू प्रतिबंधित आहेत, त्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने विकत घेता येत नाहीत. यामध्ये आयटम लॉटरीची तिकिटे, प्रतिबंधित मासिके, स्वीपस्टेकमध्ये भागीदारी आणि सर्व प्रकारच्या कॉल बॅक सेवा खरेदी करण्यास मनाई करतात. परकीय चलनात येणाऱ्या अशा वस्तू किंवा व्यवहार येतात त्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने व्यवहार करता येत नाहीत.


हे देखील पहा-

दंडाचीही तरतूद;

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना एक संदेश पाठवला आहे. त्यामध्ये क्रेडिट कार्डवर विदेशी मुद्रा व्यापार (forex trading), जुगार यासारखे काम क्रेडिट कार्डमधून प्रतिबंधित आहेत. तसेच, ही नमूद केलेली सर्व कामे परदेशात डेबिट किंवा क्रेडिट कार्डने करता येत नाहीत.

जर कोणी हा नियम मोडला तर त्याच्यावर दंडही आकाराला जाऊ शकतो. कार्डधारकावर रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमानुसार कोणते व्यवहार किंवा व्यवहार करण्यास मनाई आहे. त्यामुळे डेबिट किंवा क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कार्डधारकाला कोणतेही कार्ड ठेवण्यास प्रतिबंध केला जाईल. स्टेट बँकेने आपल्या संदेशात ही माहिती दिली आहे.

या जाहिरातींपासून सावध रहा!

नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्ती असा व्यवहार करते तर त्याविरोधात फेमा चालू खाते नियमांनुसार कारवाई केली जाईल. त्याला फेमा अंतर्गत दंड ठोठावला जाईल. ही दंडाची रक्कम व्यवहाराच्या तीनपट असू शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही परदेशात जाल तेव्हा फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. ह्या जाहिरातीमध्ये कॅसिनो, हॉटेल्स इत्यादी स्वस्त ऑफर्स किंवा सवलती दिल्या जातात आणि क्रेडिट कार्डने पैसे द्यावेत असे ऑफर्स दिल्या जातात. त्यामुळे अश्या फसव्या जाहिराती तुम्हाला मोठ्या अडचणीत पाडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT