ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजच्या धावपळीच्या जीवनात, मायक्रोवेव्ह आपल्या स्वयंपाकघराचा एक आवश्यक भाग बनला आहे.
तुम्हाला माहिती आहे का की मायक्रोवेव्हमध्ये अन्न वारंवार गरम केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते, जाणून घ्या.
मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न बहुतेकदा असमानपणे गरम केले जाते. ज्यामध्ये बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट होत नाही.
अन्न वारंवार गरम केल्याने त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते.
प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम केल्याने फॅथलेट्ससारखे हानिकारक केमिकल्स अन्नात जाऊ शकतात.
या केमिकलमुळे हार्मोनल असंतुलन आणि कर्करोगासारखे आजार होऊ शकतात.
जास्त वेळ गरम केल्याने अन्न कोरडे होऊ शकते आणि त्याची चव कमी होऊ शकते.