नवी मुंबई: पाणी समस्येमुळे टँकर माफिया सक्रिय, नागरिकांच्या खिशाला कात्री

नवी मुंबईतील खारघर हे एक विकसित शहर असून या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.
Water Cut
Water CutSaam TV
Published On

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई: नवी मुंबईतील खारघर हे एक विकसित शहर असून या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागासह शहरी भाग देखील खारघर मध्ये मोडत असून याठिकाणी पाणी प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला.

उंच उंच इमारती, मोठे रस्ते ही खारघरची ओळख असली तरी खारघर मधील पाणी प्रश्न देखील ग्रहण होत चाललाय. खारघर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना सिडको या लोकवस्तीला पाणी कसे पुरवणार याकडे मात्र लक्ष देताना दिसत नाही. सिडकोद्वारे पुरवण्यात येणारा पाणी पुरवठा आता कमी पडत असल्याने नागरिकांना याचा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

Water Cut
नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून शिक्षणाधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

मागणी वाढल्याने खरघरमध्ये मोठ्या प्रमाणात टँकर माफिया सक्रिय झाले असून नागरिकांना 5 हजारांपेक्षा अधिक रक्कम भरून टँकरने पाणी मागवावे लागत आहे. पाण्याची 2 एमएलडी क्षमता असलेली टाकी असताना त्याचा उपयोग सिडको करत नाही त्यामुळे टँकर माफिया आणि सिडकोचे लागेबांधे आहेत अशी टीका स्थानिक नगरसेवक करत आहेत.

हे देखील पहा-

एकीकडे कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात महागाई वाढत चाललंय अश्यात आता दैनंदिन कामकाजासाठी पाणी देखील विकत घ्यावे लागत असल्याने महिलावर्गाचा मासिक बजेट कोलमडलाय यामुळे सिडको प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी महिला वर्ग करतायत.

सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष आणि टँकर माफियांची वाढत चाललेली दादागिरी यात भरटला जातोय सामान्य नागरिक त्यामुळे सिडको प्रशासन नागरिकांच्या पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिल का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com