Onion Benefits Saam TV
लाईफस्टाईल

Onion Benefits : उन्हाळ्यात कांदा खाण्याचे भन्नाट फायदे; केस, त्वचा अन् उष्णतेसह विविध समस्यांवर होणार मात

Raw Onion Benefits : कांदा खाण्याचे आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होतात. शिजलेला किंवा कच्चा कांदा खाल्ल्याने शरिरातील उष्णता देखील कमी होते.

Ruchika Jadhav

नॉनव्हेज असो किंवा व्हेज झणझणीत भाजी असली की त्यासोबत जेवणात कांदा लागतोच. अनेक व्यक्ती जेवणावर कच्चा कांदा खातात. काहींना कांदा तिखट लागत असल्यास त्यावर लिंबू आणि मीठ चोळून खातात. तर काहीजण याची कोशिंबीर बनवून देखील खातात. कांदा खाण्याचे आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होतात.

उष्णता कमी होते

कांद्यामध्ये कॅल्शियम, फोलेट, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम, व्हिटॅमिन ए, सी, ई सारखे घटक असतात. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक अडथळे दूर होतात. तसेच जेवणात शिजलेला किंवा जेवणावर कच्चा कांदा खाल्ल्याने शरिरातील उष्णता देखील कमी होते.

दृष्टी स्पष्ट होते

कांद्यामध्ये अनेक पोषक घटक आहेत. त्यामुळे याचे सेवन केल्याने आपल्या शरिराला व्हिटॅमिन ए, सी आणि ई देखील मिळतं. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए, सी आणि ई फार उपयुक्त असते. त्यामुळे तुम्हाला चष्मा असेल आणि दृष्टी फार पुसट झाली असेल तर आहारातील कांद्याचे प्रमाण वाढवू शकता.

त्वचेच्या समस्या

अनेक मुलांना आणि मुलींना त्वचेशी संबंधित विविध समस्या असतात. या समस्यांपासून सुटका व्हावी म्हाणून तरुण मुलं-मुली विविध क्रिम चेहऱ्यावर लावतात. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूम, डाग, मोठे खड्डे पडले असतील तर त्वचेच्या या समस्या सोडवण्यासाठी आहारात कांद्याचं सेवन करावं. कांद्यातील अँटीऑक्सिडंमुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात.

केस

अनेक मुलींना केस गळणे, कोंडा होणे,केस पांढरे होणे अशा विविध समस्या असतात. या समस्येने तुम्हीही त्रस्त असाल तर कांद्याची साल तुमच्यासाठी फायद्याची आहे. कांद्यावर असलेल्या साली सर्व काढून घ्या. त्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करून त्यात कांद्याचे टरफल भिजत ठेवा. हेअर वॉश करण्याआठी हे पाणी केसांवर लावत जा.

टीप : कांद्याबाबत ही सामान्य माहितील आहे. याच्या वापराने असाच रिजल्ट मिळेल असा दावा साम टीव्ही करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT