Raw Mango Benefits Saam tv
लाईफस्टाईल

Raw Mango Benefits : मधुमेहासह कर्करोगावर रामबाण ठरेल आंबट-गोड कैरी !

Raw Mango Benefits For Diabetes : इतर फळांच्या तुलनेत कच्च्या कैरीत नैसर्गिक साखर खूप कमी असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे.

कोमल दामुद्रे

Raw mango is a panacea for cancer : उन्हाळा म्हटलं की, सर्वत्र आपल्याला आंबे पाहायला मिळतात. हा ऋतू साधरणत: आंब्यांसाठी ओळखला जातो. उन्हाळ्यात कच्च्या कैरीपासून लोणची, कॅन्डी, मुरबा, मसाला कैरी, पन्ह अशा अनेक पदार्थांची चव आपल्याला चाखायला मिळते.

पिकलेल्या आंब्याचे फायदे (Benefits) आपल्याला माहीतच आहे. आंबा हे भारतातील सर्वात प्रिय फळांपैकी एक आहे. आंबा (Mango) विविध पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत म्हणून ओळखला जातो. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, आहारातील फायबर आणि कॅरोटीनोइड्सचा समावेश आहे.

कच्ची कैरी ही कडक उष्णतेवर मात करण्यासाठी फायदेशीर आहे. कैरीचे पन्ह बहुतेकदा उन्हाळ्याच्या हंगामात लोक अधिक प्रमाणात सेवन करतात. कच्ची कैरी उष्माघात टाळण्यासाठी उपयुक्त आहे. कच्च्या कैरीत व्हिटॅमिन (Vitamins) सीचा चांगला स्रोत असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढवतो.

कच्च्या कैरीचे फायदे

1. साखरेची पातळी नियंत्रित करते:

इतर फळांच्या तुलनेत कच्च्या कैरीत नैसर्गिक साखर (Sugar) खूप कमी असते. त्यामुळे मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे. त्याचा वापर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतो.

2. प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत:

कच्ची कैरी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कारण यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आवश्यक पोषक घटक असतात. काही अभ्यासानुसार, एक कप आंब्याच्या रसात व्हिटॅमिन ए च्या एकूण रोजच्या गरजेच्या 10 टक्के पुरवतो.

3. हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त:

आंब्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास आणि रक्त प्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात. हे पोषक घटक तुमच्या रक्तवाहिन्या आराम करण्यास देखील मदत करतात. याशिवाय कमी रक्तदाबाच्या समस्येवरही मात करता येते. कच्च्या आंब्यामध्ये मॅनफरीन देखील मुबलक प्रमाणात असते. हे एक सुपर अँटिऑक्सिडेंट आहे, जे हृदय निरोगी ठेवण्याचे काम करते. काही अभ्यासानुसार, कच्चा आंबा रक्तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि फ्री फॅटी अॅसिड्सची पातळी कमी करण्यास मदत करतो.

4. कॅन्सरचा धोका कमी होतो :

कच्च्या कैरीमध्ये असलेल्या पॉलिफेनॉलमुळे हे फळ कॅन्सरसारख्या धोकादायक आजाराशीही लढू शकते. कच्च्या आंब्यामध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पॉलिफेनॉल ल्युकेमिया, कोलन, फुफ्फुस, प्रोस्टेट आणि स्तनाचा कर्करोग यांसारख्या कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT