Rava Cake Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Rava Cake Recipe : बेकरी स्टाईल जाळीदार आणि मऊ केक; घरच्याघरी कुकरमध्ये कसा बनवायचा?

Cake Recipe : केक आपण जेवणात गोड पदार्थ नसेल तेव्हा देखील खाऊ शकतो. अशात रोज रोज बाजारातून केक आणण्यापेक्षा घरच्याघरी तो कसा बनवायचा याची माहिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

वाढदिवस असो किंवा मग काही कार्यक्रम सर्वांना सेलिब्रेशनसाठी केक लागतोच. अशात सध्या रवा केकचे बरेच फॅन आहेत. बाजारात बेकरीमध्ये मिळणार रवा केक तुम्हालाही आवडत असेल. हा केक आपण जेवणात गोड पदार्थ नसेल तेव्हा देखील खाऊ शकतो. अशात रोज रोज बाजारातून केक आणण्यापेक्षा घरच्याघरी तो कसा बनवायचा याची माहिती जाणून घेऊ.

साहित्य

बटर

साखर

मैदा

दूध

दही

बेकिंग सोडा

इसेन्स

सुका मेवा

रवा

तूप

कृती

रवा केक बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात बटर घ्या. हे बटर छान फेटून घ्या. त्यानंतर यामध्ये दही मिक्स करा. यात आपल्याला पाणी अजिबात टाकायचे नाही. पुढे या मिश्रणात साखर छान मिक्स करून घ्या. मिश्रण एकजीव होत असताना यामध्ये इसेन्स, दूध आणि रवा मिक्स करा. तसेच नंतर यामध्ये बेकिंग सोडा देखील मिक्स करा.

हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून 15 मिनिटे तसेच ठेवा. त्यावेळात सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवा आणि सुका मेवा म्हणजेच ड्रायफ्रूटसचे बारीक काप करून घ्या. हे काप तुपात छान तळून घ्या. तसेच कुकरमध्ये थोडे मीठ टाकून ठेवा. 15 मिनिटे झाल्यावर या कुकरमध्ये केकचे तयार बॅटर ठेवून द्या.

केकचे मिश्रण कुकरमध्ये ठेवल्यावर कूकरच्या झाकणाची शिट्टी काढून टाका आणि शिट्टी शिवाय त्याचे झाकण बंद करा. साधारण 30 मिनिटे कुकर उघडू नका. 30 मिनिटांनी कुकर उघडून केकच्या अगदी मधोमध एका स्टिकने केक पूर्ण शिजला आहे की नाही हे तपासा. केक तयार झाला असेल तर तो बाहेर काढून घ्या आणि थंड होऊ द्या.

केक पूर्ण थंड झाल्याशिवाय बाहेर काढू नका. आता येथे केक थंड झाल्यावर सहज बाहेर निघावा यासाठी एक ट्रिक सांगत आहे. जेव्हा तुम्ही केकचे बॅटर एका भांड्यात ठेवाल तेव्हा त्या भांड्याला तेल किंवा बटर आधी लावून घ्या. असे केल्याने केक थंड झाल्यावर सहज बाहेर निघतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेच्या वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

Tuljapur Tulja Bhavani Mandir : तुळजा भवानी मंदिराचा गाभारा पाडणार? मंदिर जीर्णोद्धावरुन तुळजापुरात राडा

Pune Crime: पैशांची मागणी, वारंवार शिवीगाळ; तरुणीचं डोकं फिरलं, रॉडने मारहाण करत तरुणाला संपवलं

SCROLL FOR NEXT