Ragi Benefits  Saam Tv
लाईफस्टाईल

Ragi Benefits : मधुमेहांपासून ते चेहऱ्याच्या अनेक विकारांवर बहुगुणी ठरेल नाचणी !

नाचणी ही चवीला रुचकर व शरीरात ऊर्जा टिकवून ठेवणारा पदार्थ आहे.

कोमल दामुद्रे

Ragi Benefits : हिवाळ्यात अनेक संसर्गजन्य आजारांपासून सुटका होण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आपण उष्ण पदार्थांचे सेवन करतो. दररोजच्या ताटात वाढली जाणारी पोळी खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. अशावेळी पर्यायी म्हणून आपण भाकरीचा आहारात समावेश करतो. त्यातील एक नाचणी.

अनेक वर्षांपासून आपल्या देशात पारंपारिक ज्वारी, बाजरी, जव, मका आदींचा वापर केला जातो. त्यातील एक नाचणी देखील आहे. हे धान्य प्रामुख्याने हिवाळ्यात अधिक खाल्ले जाते. तसेच आरोग्याला याचे अनेक फायदे देखील होतात. नाचणी ही चवीला रुचकर व शरीरात ऊर्जा टिकवून ठेवणारा पदार्थ आहे.

वजन कमी करण्यासोबतच आजकाल आपल्या आरोग्याबाबत अनेकजण जागरुक असतात. बहुतेक लोक सामान्य गव्हाच्या पिठाच्या ऐवजी सातूचे पीठ, बाजरीचे पीठ, राजगिरा, सोया पीठ, गव्हाचे पीठ इत्यादींचा वापर करतात. असाच एक आरोग्यदायी पर्याय म्हणजे नाचणी. रागीला अनेक ठिकाणी नाचणी असेही म्हणतात.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नाचणीच्या पिठात शून्य टक्के कोलेस्टेरॉल आणि सोडियम असते तर चरबीचे प्रमाण फक्त 7 टक्के असते. याशिवाय यामध्ये आहारातील फायबर, कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम, लोह मुबलक प्रमाणात असते. प्रोटीन आणि फायबरमुळे वजन कमी करण्यासाठी हे सर्वोत्तम मानले जाते. याशिवाय नाचणीचेही अनेक फायदे आहेत.

1. मधुमेह नियंत्रणात उपयुक्त-

गहू किंवा तांदळाच्या पिठाच्या तुलनेत नाचणीमध्ये पॉलिफेनॉल आणि फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची (Sugar) पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. दिवसाच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात नाचणीचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते

2. अॅनिमियामध्ये फायदेशीर-

नाचणी लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे, त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला अॅनिमियाचा त्रास होत असेल किंवा शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल तर त्याने नाचणीचे सेवन केले पाहिजे.

Ragi Benefits

3. प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत-

नाचणी शरीरासाठी आवश्यक अमीनो ऍसिड आणि प्रथिने समृद्ध आहे. शाकाहारी लोकांच्या आहारात प्रथिन स्त्रोतांची कमतरता असते. अशा परिस्थितीत ते प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी नाचणीचे सेवन करू शकतात.

4. तणाव कमी होतो-

नाचणीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे तणाव कमी करण्यास मदत करतात. जर तुम्हाला चिंता, नैराश्य किंवा निद्रानाशाची समस्या असेल तर तुम्ही नाचणी जरूर खावी. याचा फायदा होईल.

5. त्वचा वृद्धत्वास प्रतिबंध करते-

नाचणी खाल्ल्याने त्वचा नेहमी तरुण राहते. त्यात असलेल्या अमिनो अॅसिडच्या मदतीने त्वचेची ऊती वाकत नाही, त्यामुळे सुरकुत्या पडत नाहीत. याशिवाय नाचणी ही व्हिटॅमिन (Vitamin) डीचा चांगला स्रोत आहे.

6. कॅल्शियम भरपूर-

नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असते. 100 ग्रॅममध्ये 344 मिलीग्राम कॅल्शियम उपलब्ध आहे. हाडे कमकुवत होण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये ते खाण्याचा सल्ला दिला जातो. एवढेच नाही तर वाढत्या मुलांसाठी हे फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

Car paint protection: कारचा रंग आणि चमक टिकवायचीये? या 7 टीप्सने गाडी वाटेल नवी कोरी

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT