Pune Fort AI PHOTO
लाईफस्टाईल

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला कोणता? पुण्याजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक खजिना, दिवाळीच्या सुट्टीत नक्की फिरा

Last Fort Built By Maratha Empire : किल्ल्यांमधून इतिहास आजही जिवंत आहे. सुट्ट्यांमध्ये आवर्जून किल्ले फिरायला जा आणि इतिहासाची नव्याने ओळख करून घ्या. मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला कोणता, जाणून घ्या.

Shreya Maskar

दिवाळीच्या सुट्टीत किल्ल्यांवर भटकंती करा.

मुंबई-पुण्याजवळ अनेक ऐतिहासिक किल्ले लपलेले आहेत.

महाराष्ट्रातील किल्ले ऐतिहासिक वारसा जपत आहेत.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वसलेला मल्हारगड किल्ला हा इतिहासप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. पिंपरी-चिंचवडपासून अगदी जवळ वीकेंडला फिरण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. सोनोरी गावाच्या पायथ्याशी असलेल्या या किल्ल्याला 'सोनोरी किल्ला' असेही म्हटले जाते.

मल्हारगड लोकेशन

मल्हारगड किल्ला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सोनोरी गावाजवळ आहे. पुणे शहरापासून साधारण ३० किलोमीटर आणि सासवडपासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. पिंपरी-चिंचवड पासून मल्हारगड साधारण ४३ ते ५८ किलोमीटर अंतरावर आहे. मल्हारगड हा मराठा साम्राज्यात बांधलेला शेवटचा किल्ला होय.

किल्ल्याच्या नावाचा इतिहास

या किल्ल्याचे नाव भगवान खंडोबाच्या मल्हारी या रूपावरून पडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या किल्ल्याला मल्हारगड असे नाव मिळाले. पायथ्याशी सोनोरी गाव असल्यामुळे स्थानिक लोक त्याला सोनोरी किल्ला असेही संबोधतात.

किल्ला कधी- कोणी बांधला?

मल्हारगड किल्ल्याची निर्मिती पेशव्यांच्या काळात झाली. साधारण १७५७ ते १७७५ या कालखंडात किल्ल्याचे बांधकाम झाले. पेशव्यांचे तोफखाना प्रमुख कृष्णराव महादेव पानसे आणि भिवराव यशवंत पानसे यांचा किल्ल्याच्या उभारणीत महत्त्वाचा सहभाग होता. पुणे-सासवड मार्गावरील दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. मराठा साम्राज्याच्या अखेरच्या काळात बांधलेला डोंगरी किल्ला म्हणून मल्हारगडला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे.

ट्रेकिंग स्पॉट

मल्हारगड किल्ल्याचा ट्रेक तुलनेने सोपा आहे. त्यामुळे नवशिक्या ट्रेकर्ससाठीही हा चांगला पर्याय आहे. ट्रेकिंगची सुरुवात सोनोरी गावापासून होते. साधारण ३० ते ४५ मिनिटे लागतात. मल्हारगडला भेट देण्यासाठी हिवाळा आणि पावसाळा उत्तम काळ आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये फिरायला जा. मुंबई-पुण्याजवळील लोकांनी येथे आवर्जून जावे. तुम्ही ट्रेन, बसने प्रवास करू शकता.

किल्ल्यावर गेल्यावर काय पाहावे?

मल्हारगड आकाराने फार मोठा नसला तरी येथे ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याच्या माथ्यावर महादेव मंदिर आहे. तसेच येथे मल्हारी देवतेला समर्पित असलेले खंडोबा मंदिर देखील आहे. किल्ल्यावरील बांधकामांचे अवशेष पाहताना पेशवेकालीन स्थापत्याची कल्पना येते. किल्ल्यावर जुन्या पाण्याच्या टाक्या आणि विहिरींचे अवशेष आहेत. किल्ल्याभोवती असलेली दगडी तटबंदी आणि बुरुज ऐतिहासिक बांधकामाची साक्ष देतात.

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्य वाटप

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्पच; परिवहन विभाग अन् गोकुळच्या दूध विक्रीला फटका

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹२,००० भरल्यास मुलगी होणार लखपती! मॅच्युरिटीला मिळणाऱ्या पैशांवर टॅक्स लागतो का?

Famous Singer : घटस्फोटाच्या ६ वर्षांनी प्रसिद्ध गायिका बांधणार दुसरी लग्नगाठ, होणारा नवरा आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT