Diabetes SAAM TV
लाईफस्टाईल

Diabetes : 'हा' हलका-फुलका पदार्थ मधुमेह ठेवेल नियंत्रणात, नाश्त्याला आवर्जून खा

Puffed Rice Benefits : मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहारात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या नाश्त्यात हलक्या-फुलक्या मुरमुऱ्यांचा समावेश केल्यास शरीरातील इन्सुलिन पातळी नियंत्रणात राहते.

Shreya Maskar

आजकाल मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत जात आहे. कमी वयात देखील मुलांना मधुमेह होत आहे. बदलती जीवनशैली आणि पोषक घटकांचा अभाव हे त्यामागील मुख्य कारणे आहेत. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या डाएटमध्ये पोषक पदार्थांचा समावेश करावा. रोजच्या नाश्त्याला मुरमुरे खावे. मुरमुऱ्यांमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात. जे आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांना डॉक्टर नाश्त्याला मुरमुरे खाण्याचा सल्ला देतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच पोटदेखील दीर्घकाळ भरलेले राहते. टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांनी याचा आपल्या आहारात आवश्य समावेश करावा.

वजन नियंत्रणात

वजन कमी करण्यासाठी हलके फुलके मुरमुरे नाश्त्याला खावे. मुरमुरे खाल्ल्यानं पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तसेच जास्त भूक लागत नाही. मुरमुऱ्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण देखील कमी असते.

हृदयाचे आरोग्य

मुरमुऱ्यांमधे सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच हृदयाचे विकार होत नाही.

हाडांचे आरोग्य सुधारते

मुरमुऱ्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे स्नायूंचे आरोग्य सुधारते. लहान मुलांची हाडे बळकट करायची असल्यास दुधात मुरमुरे घालून खावे. यामुळे मुलांच्या शरीराला भरपूर व्हिटामिन्स मिळतात. मुरमुऱ्यात तंतूमय घटक आतड्यांने आरोग्य सुधारते.

पचनक्रिया सुधारते

पावसाळ्यात विशेषतः मुरमुरे खावे. कारण यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत होते. मुरमुऱ्यांमधील फायबरमुळे पचन सुधारते. ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. आजपासूनच तुम्ही तुमच्या डाएटमध्ये मुरमुऱ्यांचा समावेश करावा. पोट दुखी आणि छातीत जळजळ होत असल्यास नाश्त्याला मुरमुरे खावे.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

मुरमुऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, मिनरल्स आढळतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच तुमचा मूड देखील फ्रेश होतो. मुरमुरे शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

SCROLL FOR NEXT