Pregnancy Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Pregnancy Tips : वयाची तिशी ओलांडल्यानंतर गरोदरपणात कशी घ्याल काळजी? मधुमेह- रक्तदाबाची लक्षणे कशी ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Diabetes And High Blood Pressure Disease : बरेचदा या काळात आई आणि बाळाला काही गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या गर्भधारणेपूर्वी असू शकतात किंवा ९ महिन्यात कधीही येऊ शकतात. जसे की मधुमेह हा आजार गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेमध्ये किंवा नंतरही असू शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Womens Care Tips :

आई होण्याचा काळ हा अधिक आनंदाचा असला तरीही तितकाच कठीण असतो. या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मूड स्विंगपासून ते मॉर्निंग सिकनेस अशा अनेक समस्या त्यांच्या समोर येतात.

बरेचदा या काळात आई आणि बाळाला काही गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या गर्भधारणेपूर्वी असू शकतात किंवा ९ महिन्यात केंव्हाही येऊ शकतात. जसे की मधुमेह हा आजार गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेमध्ये किंवा नंतरही असू शकतो. याबाबतची माहिती दिली आहे पुण्यातील पिंपरी हॉस्पिटलच्या डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडून. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उच्च रक्तदाब सुद्धा गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणे मध्येही निर्माण होऊ शकतो. हे दोन्ही आजार जास्त वयोगट म्हणजे ३५ वयोगटापुढील महिलांमध्ये (Women) मोठया प्रमाणात आढळून येते. काही वर्षांमध्ये यापेक्षा कमी वयामध्ये सुद्धा प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. त्याचसोबत अतिलठ्ठपणा (ओबेसिटी) ही होऊ शकते.

याची कारणे मुख्यतः बदलती जीवनशैली आहे. यामध्ये आहारामध्ये आमूलाग्र बदल झाल्यामुळे हे आजार (Disease) आपल्याला होत असताना पाहायला मिळत आहेत आणि यावर निदान करण्यासाठी विशेषज्ञांची गरज लागते.

मधुमेह (Diabetes) २ प्रकारची असू शकतात एक गर्भधारणेच्या आधीचा आणि गर्भधारांमध्ये ७ व्या महिन्यानंतर. या दोन्हीचं प्रमाण ३५ वर्षावरील महिलांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. त्यानंतर उच्च रक्तदाब (प्रिक्लेमशा) हा सुद्धा गर्भधारणेच्या आधीचा आणि गर्भधारांमध्ये ७ व्या महिन्यानंतर निर्माण होऊ शकतो. आणि यामुळेच अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. उच्च रक्तदाबामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे, अति रक्तस्त्राव होणे ह्या अधिकच्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात किंवा गरोदर महिलेला फिट्स येणे (एपिलेप्सी) यामुळे अधिकच्या समस्यांसोबत बाळाला तर धोका असतोच पण त्या आईलाच्या जीवालाही धोखा असतो. अशावेळी त्या आईला अतिदाक्षता विभागामध्ये (ICU) मध्ये भरती करावी लागते.

1. याची लक्षणे कशाप्रकारे ओळखता येतील?

खरंतर हे धोखे उद्भवू नयेत यासाठी काय काळजी घेता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रिकन्सेप्शन कौन्सिलिंग उपयुक्त ठरते. म्हणजे गर्भधारणा होण्या अगोदरच आपलं वजन नियंत्रणात आहे का? मधुमेह आहे का? आपला रक्तदाब तर वाढलेला नाहीये याची तपासणी करून घेणे आणि ह्या स्थिती सगळ्या स्थितीमध्ये तपासण्या उपलब्ध आहेत. प्रिकन्सेप्शन कौन्सिलिंगमध्ये या सगळ्या तपासण्या करून त्यानुसार आपल्याला योग्य निदान करून आटोक्यात आणू शकतो.

2. यावर कशाप्रकारे मात करता येईल?

प्रिकन्सेप्शनल कौन्सिलिंग करणे सर्वात महत्वाचे ठरते. हे जे धोखे आहेत ते आधीच म्हणजे गर्भधारणे पूर्वी ओळखता यावेत यासाठी, कारण जर ब्लड प्रेशर सामान्य नसेल, रक्तातील शर्करेचे प्रमाण सामान्य नसेल तर त्या बाळाला अपंगत्व येऊ शकते. कारण, पहिल्या ३ महिन्यामध्ये बाळाचे अवयव निर्माण होत असतात.

त्यामध्ये मेंदूचे विकार होऊ शकतात, हृदयाचे दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे प्रिकन्सेप्शनल कौन्सिलिंग खूप महत्वाचे असतात आणि समजा अनेमिया असेल तर, त्याचा परिणाम दोघांवरही होतो. बाळाची वाढ खुंटू शकते आणि जर बाळाची वाढ खुंटली तर अपुऱ्या वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते.

गर्भधारणेनंतर ७ व्या महिन्यानंतर जर रक्तदाब वाढला तर बाळाला होणार रक्तपुरवठा अपुरा होऊ शकतो. रक्त पुरवठा अपुरा झाला तर प्राण वायू म्हणजे ऑक्सिजन आणि अन्न पुरवठा जो बाळाच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहे तो होऊ शकणार नाही. ऑक्सिजन आणि आहार पोचवण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो यामुळेच बाळाची वाढ खुंटू शकते. अशा बाळांना जन्मानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बाळाला गर्भाशयात असताना योग्य पोषण होणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT