Monday Horoscope: या ६ राशींचं श्री गणेश करतील कल्याण; सोमवार ठरेल आनंदाचा दिवस

Bharat Jadhav

मेष

भगवंताची कृपा असेल तर सर्व गोष्टी सुकर होतात. अशी काहीशी अनुभूती येण्याचा आजचा दिवस आहे. ठरवलेल्या गोष्टी नियोजनबद्ध झाल्यामुळे एक वेगळा दिलासा मिळेल.

वृषभ

आज विनायक चतुर्थी रिक्ता तिथी आहे. काही गोष्टी रिक्तपणे देऊन आपण रिक्त झालेले योग्य असते. अडचणींचा सामना करावा लागेल.

मिथुन

भागीदारी व्यवसायामध्ये आज फायदा आहे. नको असलेल्या कटकटी मागे लागतील.

कर्क

मानसिक अस्वस्थता जाणवणार. हळवेपण जास्त दाटेल.आपल्याच लोकांनी घात केल्यासारखी भावना आज होईल.

सिंह

उपासना, प्रवास, संततीसौख्य, विद्यार्जन, शेअर्स, लॉटरी, कला, क्रीडा, प्रेम, प्रणय, धनलाभ या सर्व गोष्टींसाठी आजचा दिवस चांगली संधी घेऊन आलेला आहे.

कन्या

गृहसौख्य उत्तम राहील. घरी पाहुण्यांची ऊठबस होईल. कामांमध्ये प्रगती होईल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आज आनंदमय काही गोष्टी घडतील. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. नवीन जबाबदाऱ्या पेलाल.

वृश्चिक

तिखट मसालेदार पदार्थ खाण्यासाठी इच्छा होईल. जोडीदाराची तब्येत आज जपावी.

धनु

स्वच्छंदी आनंद दिवस जगण्यासाठी विशेष खटाटोप कराल. आरोग्य चांगले राहून कामे मार्गी लागतील.

मकर

सहज सोप्या गोष्टी अवघड होऊन बसतील. आज शक्तीने नाही तर युक्तीने काम करावे लागेल.

कुंभ

मोठी काही स्वप्न तुम्ही पाहिली असतील तर आज ती पूर्ण होण्याचा दिवस आहे.

मीन

कामाच्या ठिकाणी यश असा काहीसा दिवस आहे. वरिष्ठांना मान द्या आणि तुमचा सन्मान घ्या.