Pregnancy Health Saam Tv
लाईफस्टाईल

Pregnancy Health : COPD म्हणजे काय? गर्भधारणेदरम्यान महिलांना करावा लागतो या आजाराचा सामना,कशी घ्याल काळजी

Pregnancy and Chronic Obstructive Pulmonary Disease : क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज किंवा सीओपीडीमुळे श्वास घेण्यास त्रास होणे आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pregnancy Tips :

गर्भधारणेदरम्यान सीओपीडीचे व्यवस्थापन करुन आई आणि बाळ दोघांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज किंवा सीओपीडीमुळे श्वास घेण्यास त्रास होणे आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते.

सीओपीडीचा आजार गंभीर असून गर्भधारणेदरम्यान गुंतागुत वाढू शकते. गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल श्वसनसंस्थेवर परिणाम करतात आणि त्यामुळे जळजळ होते व श्वास घेण्यास अडचणी येतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खराडी येथील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पीटलच्या डॉ. प्रिथीका शेट्टी म्हणतात. गरोदरपणात सीओपीडीचा केवळी शारीरिकरित्याच नाही तर गर्भवती मातांच्या भावनिक आरोग्यावरही परिणाम करतो. स्वत:साठी आणि गर्भातील बाळासाठी ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात न होता चिंता आणि तणावाची पातळी वाढू शकते. शिवाय, सीओपीडीमुळे एखाद्याच्या शरीरावर पडणाऱ्या ताणामुळे मुदतपूर्व प्रसूती किंवा जन्मतः वजन कमी असणे यासारख्या गुंतागुंतीचा धोका वाढू शकतो. सीओपीडी असलेल्या गर्भवती महिलांनी आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गर्भधारणेदरम्यान (Pregnancy) सीओपीडीवर उपचार करण्याच्या मुख्य पैलूंपैकी एक म्हणजे औषधांद्वारे या आजारांवर मात करणे. सीओपीडी असणा-या स्त्रियांनी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे सेवन करणे गरजेचे आहे. कारण वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचा डोस मध्येच थांबवणे किंवा बदलणे हानिकारक ठरु शकते.

सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गर्भधारणेदरम्यान काही औषधे बदलण्याची आवश्यक भासू शकते, म्हणून सीओपीडी असलेल्या गर्भवती महिलांनी त्यांच्या डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा.

औषधोपचाराद्वारे व्यवस्थापनाव्यतिरिक्त, जीवनशैलीतील बदल देखील गर्भधारणेदरम्यान सीओपीडीचे व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. गर्भवती आई आणि तिच्या बाळासाठी धूम्रपान टाळणे देखील गरजेचे आहे. लक्षणे कमी करण्यासाठी आणि फुफ्फुसाचे कार्य चांगले रहावे यासाठी प्रदुषकांच्या (Pollution) संपर्कात येणे टाळावे.

वैयक्तिक क्षमतेनुसार नियमित व्यायाम केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांवर मात करणे शक्य होते आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. वासोच्छवासाचे व्यायाम आणि मेडिटेशन जसे की योग आणि ध्यान यांचा दैनंदिन जीवनात समावेश करा. सीओपीडीसह जगताना गर्भधारणेदरम्यान पोषक आहार आणि व्यायामाद्वारे निरोगी जीवनशैली राखणे अधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि तुम्हाला आणि तुमच्या बाळासाठी आवश्यक जीवनसत्त्वे मिळू शकतात. चालणे किंवा प्रसुतीपुर्व योगसाधना केल्याने शरीर सक्रिय राहण्यास मदत होते तसेच श्वासोच्छवासाची क्षमता सुधारते. गर्भधारणेच्या संपूर्ण प्रवासात मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषत: सीओपीडी असलेल्या गरोदर महिलांसाठी समुपदेशन गरजेचे आहे. लक्षात ठेवा की या अनुभवात तुम्ही एकटे नाहीत.

तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधांचे सेवन तसेच योग्य जीवनशैलीचे पालन केलायास सीओपीडी असलेल्या महिलांचा गर्भधारणेदरम्यानचा प्रवास सुखकर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

SCROLL FOR NEXT