Corona Vaccination For Children Saam Tv
लाईफस्टाईल

Corona Vaccination For Children: 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोविडची लस घेताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

देशभरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्याच दरम्यान 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरणही सुरू झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशभरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्याच दरम्यान 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरणही सुरू झाले आहे. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम आतापर्यंत नोंदवले गेलेले नाहीत. तथापि, पालकांनी सुद्धा लक्ष दिले पाहिजे की लस घेतल्यानंतर आपल्या मुलांमध्ये काही लक्षणे तर दिसून येत नाहीत. जर तुमच्या किशोरवयीन मुलांनी लस घेतली असेल किंवा ती घेण्याची तयारी करत असेल, तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (Corona Vaccination For Children)

लसीकरणानंतर काही परिणाम दिसले तर व्हा अलर्ट;

लसीनंतर झाल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम प्रौढांमध्ये दिसून आले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये देखील दुष्परिणाम दिसून येऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ विकास मौर्य म्हणाले, "किशोरांना लसीनंतर काही सौम्य लक्षणे दिसू शकतात जसे की ताप, डोकेदुखी, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना, थकवा इ. लस दिल्यानंतर या व्यतिरिक्त काही विचित्र लक्षणे आढळल्यास पालकांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

लस दिल्यानंतर या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा;

लस दिल्यानंतर, अधिक पाणी पिणे, संतुलित आहार घेणे यासारख्या आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. आहारात हिरव्या भाज्या, हळद, लसूण आणि व्हिटॅमिन सी समृद्ध फळे घ्या. यासोबतच ७ ते ८ तासांची गाढ झोप घेणे देखील आवश्यक आहे. (Children Corona Vaccination)

हे देखील पहा-

मुलांची घ्या विशेष काळजी;

जर इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी जास्त वेदना होत असतील तर, तुम्ही हलके हाताचे व्यायाम करू शकता. त्यासोबत मास्क नियमित वापर, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, सामाजिक अंतर पाळा आणि हात धुत रहा. कोविडच्या तिसर्‍या लाटेत, लहान मुलांना लस न मिळाल्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT