Pranayam Benefits Saam TV
लाईफस्टाईल

Pranayam Benefits : बाळाचा विचार करताय? अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय? 'या' प्राणायमाचे होतील फायदे !

योगासनामुळे आरोग्य निरोगी राहाते आणि हे नेहमीच मानण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मानसिक तणावात असाल तर योगाचा नक्कीच फायदेशीर ठरते.

कोमल दामुद्रे

Pranayam Benefits : उत्कृष्ट जीवनशैली हवी असेल तर आपल्या आयुष्यात योग किंवा प्राणायमांचा समावेश करून घ्या. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगले राहाते. योगासनामुळे आरोग्य निरोगी राहाते आणि हे नेहमीच मानण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मानसिक तणावात असाल तर योगाचा नक्कीच फायदेशीर ठरते. मात्र योगा करत असताना याच्या नियमांचं पालन करणेही आवश्यक आहे.

विवाहित जोडप्यासाठी मूल हे कुटुंब पूर्ण करण्याचे सर्वात मोठे साधन आहे. पण धावपळीच्या जीवनात आणि आधुनिक जीवनशैलीत स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये प्रजनन समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशा परिस्थितीत महिलांना इच्छा असूनही गर्भधारणा करता येत नाही. या समस्येसाठी जोडपी डॉक्टरांकडे धाव घेतात आणि आपला वेळ आणि पैसा पाण्यासारखा खर्च करतात, परंतु डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी अशी जोडपी स्वतःहून त्यांची समस्या सोडवू शकतात. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.

आजच्या जीवनशैलीत (Lifestyle) महिलांमध्ये प्रजनन क्षमतेची समस्या वाढत आहे. अशा परिस्थितीत महिलांची इच्छा असूनही गर्भधारणा करता येत नाही. त्यांची ही समस्या काही योगासनांच्या माध्यमातून दूर केली जाऊ शकते.

१. सूर्यनमस्कार -

नियमित मासिक पाळी न येण्यासाठी आणि रजोनिवृत्ती दरम्यान होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे योगासन खूप प्रभावी ठरते. मासिक पाळीच्या वेळी पोटातील क्रॅम्प कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार खूप फायदेशीर मानले जाते. स्त्रियांच्या गर्भाशयावर होणारा रजोनिवृत्तीचा प्रभाव आणि बाळंतपणाच्या वेळीही योगासन फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते, सूर्यनमस्कार आपल्याला आपल्या लैंगिक ग्रंथींना नुकसान होण्यासारख्या समस्यांपासून दूर ठेवतो.

२. फुलपाखरू आसन -

फुलपाखराची मुद्रा आतील मांड्या, नितंब आणि गुडघ्यांचे स्नायू ताणते. त्याचबरोबर हे आसन केल्याने शरीरात लवचिकता येते. फुलपाखरू आसनाच्या रोजच्या सरावाने प्रजनन क्षमता वाढते. त्याच वेळी, हे आसन प्रसूतीच्या वेळी स्त्रियांना होणारे तीव्र वेदना कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

३. पश्चिमोत्तनासन -

हे आसन आपल्या शरीरातील स्नायूंना ताणते. पश्चिमोत्तानासन केल्याने प्रजनन क्षमता वाढते. याशिवाय यामुळे आपला मानसिक ताणही बऱ्याच अंशी कमी होतो.

४. बालासन -

प्रजननक्षमतेशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बालासन महिला आणि पुरुष दोघांनाही खूप प्रभावी ठरू शकते. आपल्या शरीरातील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी योगासन खूप फायदेशीर (Benefits) आहे. याशिवाय हे आसन केल्याने पाठ, गुडघे, नितंब आणि मांड्या यांचे स्नायू ताणले जातात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

SCROLL FOR NEXT