Yoga Tips : पुरुषांनी करायला हवे 'हे' आसन, होतील आरोग्यास अनेक फायदे !

योग हे असे आसन आहे ज्यामुळे प्रत्येक जण निरोगी राहू शकतो.
Yoga Tips
Yoga TipsSaam Tv

Yoga Tips : योग हे असे आसन आहे ज्यामुळे प्रत्येक जण निरोगी राहू शकतो. तसेच योगासने नियमित केल्याने अनेक गंभीर आजार बरे होण्यास मदत होते.

योग ही कोणत्याही मानवासाठी अमूल्य देणगी आहे. योग्य रीतीने केले तर, कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

Yoga Tips
Yoga Tips : झोपेच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते ही समस्या, या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी ही योगासने करा

योगासने केल्याने रक्तातील साखर (Sugar), उच्च रक्तदाब, हृदय व मेंदू निरोगी राहाते. यामुळे मनात नकारात्मक विचारही येत नाही. दिवसभर ऊर्जात्मक राहायचे असेल तर आपण नियमित योगासने करायला हवी. पंरतु, योग हे फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी (Mens) देखील करायला हवे त्याचा फायदा त्यांना कसा होतो हे जाणून घेऊया.

पुरुषांसाठी बटरफ्लाय योगाचे फायदे

Yoga Tips
Fitness Freak : व्यायाम करायला वेळ नाही ? ऑफिसमध्ये करा याप्रकारे योग, शिल्पा शेट्टी सांगतेय त्याबद्दल

१. बटरफ्लाय आसन केल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता मजबूत होते. हे आसन केल्याने तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. बटरफ्लाय योगा स्त्री आणि पुरुष दोघांनीही केला पाहिजे.

२. फुलपाखराची मुद्रा केल्याने तुमचे अंतर्गत स्नायू मजबूत राहतील. हे आसन केल्याने मांडीच्या स्नायूंवरील ताणापासून आराम मिळतो. त्याचबरोबर गुडघेदुखीपासूनही आराम मिळतो.

३. थकवा, अशक्तपणा यांसारख्या समस्या कायम असणाऱ्यांनी हे आसन सुरू करावे, लवकरच फायदा होईल. त्याच वेळी, ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

Yoga Tips
Heart Care Tips : हृदयाचे आरोग्य राखायचे आहे ? तर ही योगासने करा

कसे कराल ?

सर्व प्रथम, योगा चटई घाला, नंतर गुडघे वाकवा आणि पाय श्रोणीच्या जवळ आणा. तुमच्या पायाचे तळवे एकमेकांशी तंतोतंत जोडलेले आहेत याची खात्री करा. दोन्ही पाय हातांनी घट्ट पकडून ठेवा. आता फुलपाखराच्या पंखांप्रमाणे मांड्या वर आणि खाली हलवायला सुरुवात करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com