Fitness Freak : व्यायाम करायला वेळ नाही ? ऑफिसमध्ये करा याप्रकारे योग, शिल्पा शेट्टी सांगतेय त्याबद्दल

ऑफिसच्या वेळेत अशाप्रकारे करा योग
Fitness Freak
Fitness FreakSaam Tv

Fitness Freak : शिल्पा शेट्टी ही तिच्या आरोग्याच्या बाबतीत अधिक सक्रीय असते. तिच्या योगासनाचे व्हिडीओ व त्याबद्दलच्या टिप्स ती सोशल मिडियावरून सतत शेअर करत असते.

बॉलीवूडची सगळ्यात फेमस, सुंदर व फिट्नेस फ्रिक म्हणून शिल्पा शेट्टीला ओळखले जाते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण इतके व्यस्त असतो की, त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. परंतु, शिल्पाने सांगितलेल्या या योगासनांचा वापर आपण ऑफिसमध्ये करु शकतो.

जर योग (Yoga) करताना आपल्याला जमिनीवर बसता येत नाही, गुडघेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास होत असेल, तो खुर्चीवर बसून या स्ट्रेचसाठी आसने करू शकतो. ही आसने मणक्याचे आणि पाठीच्या स्नायूंची लवचिकता मजबूत करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी फायदेशीर आहेत आणि पचनसंस्थेसाठी देखील उपयुक्त आहेत.

त्यासाठी तिने व्हील चेअरवर बसून काही योगासने केली आहेत. जे ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी प्रभावी ठरू शकते. चला जाणून घेऊया त्या आसनांचे फिटनेस (Fitness) फायदे.

१. पर्वतासन -

हे आसन नमस्कार आकारातील सर्वात प्रमुख आसन आहे. हे आसन करण्यासाठी दोन्ही हात जोडून खुर्चीवर बसावे. दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या. डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या. २० ते ३० सेकंदांसाठी अंतिम पोझ धरा व त्यानंतर आराम करा

Fitness Freak
Yoga Tips : झोपेच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते ही समस्या, या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी ही योगासने करा

२. पार्श्वकोणासन -

हे आसन करताना एका हाताने पाय आणि दुसरा हात वर ठेवता. खुर्चीवर हे आसन करण्यासाठी दोन्ही हात पसरवा. श्वास घेताना, डावा हात वरच्या दिशेने हलवा आणि उजव्या हाताने आकाशाकडे पाहण्याचा प्रयत्न करा.

३. भारद्वाजासन -

हे आसन करताना मणक्यावर जोर द्या त्यासाठी खुर्चीवर सरळ बसा. दोन्ही तळवे समोरासमोर ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि मणक्यावर लक्ष केंद्रित करा. श्वास घेताना, वरचा धड शक्य तितका फिरवा आणि आराम करा, ही प्रक्रिया करत असताना, पाठीचा कणा थोडा वाकवा, आता पुन्हा आराम करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com