Heart Care Tips : हृदयाचे आरोग्य राखायचे आहे ? तर ही योगासने करा

हृदयाचे आरोग्य जपाल तर सुरक्षित राहाल !
Heart Care Tips
Heart Care TipsSaam Tv
Published On

Heart Care Tips : हृदयाचे आरोग्य जपाल तर सुरक्षित राहाल ! आपल्या दैनंदिन जीवनात योगासने करणे अधिक गरजेचे आहे. पुरेसा आहार व नियमित व्यायाम केल्याने आपल्या शरीराचे आरोग्य सुरळीत राहाते.

योग ही कोणत्याही मानवासाठी अमूल्य देणगी आहे. योग्य रीतीने केले तर, कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

हृदयविकारापासून मुक्त राहण्यासाठी योगासनेही आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. अशा वेळी जेव्हा आहार आणि जीवनशैली या सर्व गोष्टींवर विश्वास बसत नाही, तेव्हा आपण योगावर अवलंबून राहू शकतो.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी योगा कसा फायदेशीर आहे?

निरोगी हृदयासाठी योगा केला जातो परंतु, योग हृदयासाठी किती फायदेशीर ठरेल? योग हा एक असा सराव आहे जो शरीर, श्वास आणि मन यांना एकत्र बांधतो, ज्यामुळे हृदय गती देखील सुधारते. याशिवाय योगा केल्याने तणाव कमी होतो आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Heart Care Tips
Yoga Tips : झोपेच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते ही समस्या, या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी ही योगासने करा

ही योगासने करा व हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या -

१. भुजंगासन

Bhujangasana
BhujangasanaCanva

भुजंगासनाला कोब्रा पोज असेही म्हणतात. मुळात हे आसन आपले हृदय मजबूत करते. यामुळे पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत होतो आणि पाठदुखीपासूनही आराम मिळतो.

२. ताडासन

Tadasana
TadasanaCanva

ताडासन केल्यामुळे हृदयाची गती सुधारू शकते आणि रक्तदाब संतुलित होऊ शकतो. तसेच, हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सकारात्मक सुधारणा होऊ शकते. ताडासनामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

३. वृक्षासन

vrikshasana
vrikshasanacanva

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या वेबसाइटवरील संशोधनात असे आढळून आले आहे की वृक्षासन योगा केल्याने हृदय गती आणि सिस्टोलिक रक्तदाब प्रभावीपणे सुधारू शकतो.

४. उत्कटासन

Utkatasana
UtkatasanaCanva

उत्कटासन योगासन केल्यामुळे हृदयाच्या आरोग्याला त्याचा फायदा होतो. उत्कटासन योग केल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, सिस्टोलिक रक्तदाब आणि डायस्टोलिक रक्तदाब प्रभावीपणे सुधारून ते हृदयाच्या आरोग्यासाठी (Health) देखील फायदेशीर ठरू शकते.

५. वीरभद्रासन

Virabhadrasana
Virabhadrasana Canva

या योगासनाला योद्धा मुद्रा असेही म्हणतात. यामध्ये जमिनीवर उभे राहून पायांमध्ये जागा करून हा योगा केला जातो. वीरभद्रासन योगासनाचे फायदे (Benefits) हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com