Pollution Affect Health
Pollution Affect Health Saam Tv
लाईफस्टाईल

Pollution Affect Health : वाढत्या प्रदूषणामुळे वाढू शकते का साखरेची पातळी? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

कोमल दामुद्रे

Pollution Affect Health : नुकतेच बदलेल्या हवामानामुळे मुंबईतील प्रदूषणात प्रचंड बदल होताना दिसत आहे. प्रदूषण म्हटलं की, हवा, पाणी इत्यादी प्रदूषित करण्याची प्रक्रिया, ज्याचा मानवावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. प्रदूषण हा आजकाल सर्वात गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.

रक्तातील साखरेबद्दल बोलायचे झाले तर आपल्या शरीरातील उर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी होणे म्हणजे मधुमेह हा चयापचयचा विकार आहे. रक्तातील साखरेची पातळी बरोबर नसेल तर इतर अनेक आजार होण्याची शक्यताही वाढते. वाढत्या प्रदूषणामुळे साखरेची पातळी खालावत असल्याचे आढळून आले आहे.

1. प्रदूषणामुळे साखरेची पातळी खालावू शकते

एनसीबीआयने केलेल्या अभ्यासादरम्यान, वायू प्रदूषणाचा मधुमेहावर वाईट परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. हवेतील प्रदूषकांची उच्च सांद्रता आणि वायू प्रदूषकांच्या दीर्घ संपर्कामुळे टाइप 2 मधुमेहाशी संबंधित बायोमार्कर्स वाढताना दिसून येत आहे. हवेतील प्रदूषक मिश्रणातील रासायनिक घटक टाइप 2 मधुमेहावर (Diabetes) वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम करू शकतात. परंतु, वाढत्या प्रदूषणांचा मधुमेहावर कसा होतो हे जाणून घेऊया

2. प्रदूषणामुळे मधुमेह कसा होऊ शकतो?

मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, प्रदूषणामुळे रक्तातील साखरेमध्ये अनेक बदल दिसून येत आहेत. मात्र, प्रदूषण आणि मधुमेह यांचा संबंध अजूनही पूर्णपणे सिद्ध झालेला नाही. परंतु, तज्ज्ञांचे असे मत आहे की, जेव्हा प्रदूषणातील काही घटक हे श्वासामार्फत रक्तप्रवाहात प्रवेश करतात. ज्यामुळे त्याचा ऊतक आणि अवयवांवर परिणाम करते. याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो, ज्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता आणि उत्पादनात समस्या निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारे साखरेची (Sugar) पातळी बिघडू शकते.

प्रदूषणाचा परिणाम केवळ रक्तातील साखरेवरच होत नाही तर त्यामुळे इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात, जसे की श्वसनाचे आजार, त्वचेच्या समस्या, प्रतिकारशक्ती कमी होणे इ.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

SCROLL FOR NEXT