Pneumonia infection saam tv
लाईफस्टाईल

Pneumonia infection: हिवाळ्याच्या दिवसात वाढतोय न्यूमोनियाचा संसर्ग; डॉक्टरांनी सांगितला बचावाचा सोपा मार्ग

Pneumonia infection prevention: वातावरणात थंडी वाढताच अनेक आरोग्य समस्या डोके वर काढतात. यापैकी एक गंभीर समस्या म्हणजे न्यूमोनियाचा संसर्ग. न्यूमोनिया हा फुफ्फुसांशी संबंधित एक गंभीर संसर्ग आहे

Surabhi Jayashree Jagdish

हिवाळा सुरू होताच वाढलेली थंडी, धुकं आणि कोरड्या हवेमुळे श्वसनविकारांची प्रकरणं वाढू लागली आहेत. यामध्ये सर्वाधिक वाढ ही न्यूमोनिया या संसर्गजन्य फुफ्फुसांच्या आजारात दिसतेय. जेव्हा तापमानात घट होते तेव्हा अनेकांना फुफ्फुसांच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल यांनी सांगितलं की, लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटात न्यूमोनियाचा संसर्ग आढळून येतो. यामध्ये खोकला येणे, ताप आणि थंडी वाजून येणे श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखणे आणि अंगदुखी सारखी लक्षणं दिसून येतात.

तुम्ही तुमच्या फुफ्फुसांचे संरक्षण कसे कराल?

लसीकरण करा

न्यूमोकोकल लस ही तीव्र बॅक्टेरिया संसर्गापासून संरक्षण करते. दोन वर्षाखालील मुलं, 65 वर्षावरील व्यक्ती आणि कोमॅार्बिडीटीज असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करणे महत्वाचे आहे. ही लस संसर्ग रोखण्यास मदत करते आणि संसर्ग झाल्यास त्या संसर्गाची तीव्रता कमी करण्यास मदत करते.

योग्य स्वच्छता राखा

साबणाने स्वच्छ हात धुवावे, गरज पडल्यास सॅनिटायझरचा वापर करणं आणि आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी वावरणं टाळा आणि बाहेर पडताना मास्कचा वापर करा.

आहार आणि झोप

फळे, भाज्या आणि तृणधान्यांनी समृद्ध संतुलित आहाराची निवड करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. हायड्रेटेड रहा, नियमित व्यायाम करा आणि ७ ते ९ तासांची पुरेशी झोप घ्या.

धूम्रपान टाळा

धूम्रपान, सेकंड हॅंड स्मोकींग किंवा वायू प्रदूषणाने फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि संसर्गाची शक्यता वाढते. बाहेरील हवेची गुणवत्ता खराब असताना शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.

न्यूमोनिया च्या उपचारांमध्ये अँटीबायोटिक्स किंवा अँटीव्हायरल औषधांचे सेवन करणे, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास ऑक्सिजन थेरपी, गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल करणे, पुरेशी विश्रांती घेणे, आहारात द्रवपदार्थांचा समावेश करणे आणि उपचार हे रुग्णाच्या गरजेनुसार तयार केले जातील. वेळीच निदान व उपचाराने न्युमोमियामुळे होणारी गंभीर गुंतागुत टाळता येते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Pune : मुंब्र्यानंतर पुण्यात छापेमारी, कोंढव्यात एकजण ताब्यात, दहशतवादी जुबेर हंगरगेकरसोबत कनेक्शन

Gavran Style Paneer Chilli Recipe: आजीच्या हातची गावरान स्टाईल पनीर चिली, आता फक्त १० मिनिटांत बनवा, सोपी रेसिपी

स्मशानात जातो, करणी करतो, चुटकी वाजवतो अन् भूतबाधा काढतो; कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर; धक्कादायक VIDEO व्हायरल

Shocking : धक्कादायक! भर लग्नमंडपात नवरदेवावर हल्ला, बोहल्यावर चढणार इतक्यात...

SCROLL FOR NEXT