French Fries Dangerous For Health: फ्रेंच फ्राईज नव्हे 25 सिगारेटचा धूर, काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? Fact Check

French Fries: फ्रेंच फ्राईज खाणाऱ्यासाठी धक्का देणारी माहिती समोर आली आहे.
Health
French FriesSaam Tv
Published On

तुम्ही फ्रेंच फ्राईज चवीचवीनं खाता का...? आवडीने फ्रेंच फाईज खात असाल तर थोडं थांबा आणि ही बातमी पूर्ण पाहा...कारण, तुम्ही खात असलेलं फ्रेंज फ्राईज नव्हे तर सिगारेट ओढताय...असं आम्ही का म्हणतोय...ते पाहिल्यानंतर तुम्हीहीरी सावध व्हाल...

Health
Chinese Factory: चायनीज पकोडा बनवताना शर्ट अडकला; २३ सेकंदात मशीनने मजुराचा घात केला; थरकाप उडवणारा Video Viral

वरील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील...तुम्ही फ्रेंच फाईज कधी कधी खाल्ले हे तुम्ही आता आठवत असाल...कारण, व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला धडकी भरणार एवढं नक्की...हे आम्ही एवढ्या ठामपणे का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहा.....

फ्रेंच फ्राईज नव्हे 25 सिगारेटचा धूर?

आवडीने फ्रेंच फ्राईज खाल तर आजारी पडाल?

काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

फ्रेंज फ्राईजमध्ये तब्बल 25 सिगारेटच्या धुराइतकं घातक असतं असा दावा करण्यात आलाय...मात्र, हा दावा खरा आहे का..? फ्रेंच फ्राईज खरंच इतके घातक आहेत का...? लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच चवीचवीने फ्रेंच फ्राईज खातात...त्यामुळे या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...आमचे प्रतिनिधी एक्सपर्टला भेटले...त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला...

Health
Viral Video: अरे देवा...मार्केटमध्ये आलं चिकन टिक्का चॉकलेट; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आला पाहुयात... फ्रेंच फ्राईज खाणं म्हणजे⁠, 25 सिगारेट पिण्यासारखं ट्रान्सफॅटचं सेवन मानवी शरीरासाठी अंत्यत धोकादायक वनस्पती तूप, डालडा, पाम तेलात ट्रान्सफॅट असतात डीप फ्राय केलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक हृदयरोग, ब्लड प्रेशर, आतड्यांवर परिणाम होऊ शकतो

Health
Fact Check : तेल बियांच्या तेलामुळे कॅन्सरचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

भारतात 2022 पासून 2 टक्केच ट्रान्सफॅट वापरण्यास परवानगी आहे...तसेच, केंद्र सरकारचा 2025 पर्यंत ट्रान्सफॅट पूर्ण बंद करण्याचा विचार आहे...ज्या देशांनी ट्रान्सफॅटवर बंदी आणलीय, तिथे हृदयरोगाचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यांपर्यंत कमी झालंय...त्यामुळे आमच्या पडताळणीत फ्रेंच फ्राईज 25 सिगारेटच्या धुराइतकं घातक असल्याचा दावा सत्य ठरलाय..तळलेले पदार्थ चवीला चांगले लागत असतील तर घरीच हे पदार्थ चांगल्या तेला तळा आणि आरोग्याची काळजी घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com