Fact Check : तेल बियांच्या तेलामुळे कॅन्सरचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

Cancer Risk From Seed oil: आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची.तुम्ही जेवणात तेलाचा अति प्रमाणात वापर करता का? तेल बियांच्या तेलाचा वापर करत असल्यास कॅन्सरचा धोका उद्धभवू शकतो असा दावा करण्यात आलाय...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं. चला पाहुयात.
 Seed oil
Cancer Risk From Seed oilGoogle
Published On

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

तुम्ही खाद्य तेलाचं जास्त प्रमाणात वापर करता का? पदार्थ तळलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.थेट कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. मात्र. या दाव्यात तथ्य आहे का? की लोकांना घाबरवण्यासाठी हा दावा केलाय? याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय ते पाहुयात.

 Seed oil
Viral News: चिप्स खाल तर लवकर म्हातारे व्हाल? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

व्हायरल मेसेज

अमेरिकेत केलेल्या अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आलीय. स्वयंपाकाचे तेल कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. तेल बियांच्या तेलाच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. आतड्याच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या 80 रुग्णांवर संशोधन करण्यात आलं. या संशोधनात 30 ते 85 वर्षे वयोगटातील लोकांचे 81 ट्यूमरचे नमुने पाहण्यात आले. त्यांच्या कॅन्सरच्या ट्यूमरमध्ये लिपिडचे प्रमाण अधिक असल्याचे कारण बियांचे तेल मानलं गेलं. त्यामुळे हा दावा कितपत खरा आहे. याचं सत्य जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी तज्ज्ञांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

 Seed oil
Grocery: किराणामाल आरोग्याला घातक?तारीख बदलून ग्राहकांच्या जीवाशी खेळ

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

रिफाइंड तेल जास्त वापरणे चांगले नाही.

परत परत उकळलेलं तेल वापरू नये .

खाद्यतेल सतत उकळल्यामुळे कार्बन तयार होतात.

सतत उकळलेल्या तेलामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

तेलबियांचे तेल सतत खाल्ल्याने हृदयरोग होऊ शकतो.

तेलबियांपासून रिफाइंड पद्धतीने बनवलेल्या तेलात सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट असतात⁠.त्यांचे प्रमाण जास्त असल्यास ते आजारांना निमंत्रण देतात. त्यामुळे तुम्ही खाद्य तेलाचा वापर कमी प्रमाणातच करा.नाहीतर खाद्यतेलाचा अतिवापर तुम्हाला आजारी पाडू शकतं.आमच्या पडताळणीत तेलाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका असल्याचा दावा सत्य ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com