PM Awas Yojana  Saam Tv
लाईफस्टाईल

PM Awas Yojana: घराच्या स्वप्नांचा होईल चुराडा, ऑनलाइन फॉर्म भरताना लक्षात घ्या कोणत्या गोष्टी आवश्यक; वाचा सविस्तर

PM Awas Yojana Details : तुमचे घराचे स्वप्न अजून पूर्ण झाले नसेल, तर तुम्ही ते PM आवास योजनेअंतर्गत पूर्ण करू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Apply For PM Awas Yojana :

तुमचे घराचे स्वप्न अजून पूर्ण झाले नसेल, तर तुम्ही ते PM आवास योजनेअंतर्गत पूर्ण करू शकता. ही योजना केंद्र सरकारची आहे. या योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना मिळतो. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना घरे दिली जातात. जर तुम्हीही या योजनेअंतर्गत घराचे स्वप्न पूर्ण करत असाल तर फॉर्म भरण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. एक छोटीशी चूक तुमच्या स्वप्नातील घर उद्ध्वस्त करू शकते.

पीएम आवास योजनेसाठी अर्ज (Application) करण्यापूर्वी तुम्ही अपात्र आहात की नाही ते तपासा. तुम्ही अपात्र असल्यास, तुमचा अर्ज नाकारला जाईल. यामध्ये प्रथम लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाते आणि त्यानंतर अर्जदाराची चौकशी केली जाते. यानंतर सर्व काही बरोबर असल्याचे लक्षात आल्यावर घर बांधण्यासाठी फक्त आर्थिक मदत मिळते.

या योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

पीएम आवास योजनेच्या नियमांनुसार यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःचे घर नसावे. तुमच्या कुटुंबातील एखाद्याला सरकारी नोकरी असली तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. कारण या प्रकरणात तुम्ही या योजनेची पात्रता पूर्ण करत नाही. EWS आणि LIG श्रेणीमध्ये, कुटुंबातील फक्त महिला प्रमुखालाच या योजनेचा (Scheme) लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, EWS शी संबंधित लोकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

पंतप्रधान आवास योजनेचे फायदे

देशातील बहुतांश गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे अजूनही कच्चा आणि तात्पुरत्या घरात राहतात. त्यांना कायमस्वरूपी घर मिळावे यासाठीच पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एका कुटुंबाला घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. या योजनेत कुटुंबाच्या उत्पन्नानुसार कर्ज व अनुदान दिले जाते.

या प्रकरणात अर्ज नाकारला जाईल

पीएम आवास योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही त्यासाठी तुमची पात्रता तपासली पाहिजे. कारण जर तुम्ही या योजनेत अपात्र ठरलात तर तुमचा अर्ज नाकारला जाईल. यामध्ये प्रथम लाभार्थ्यांची यादी जारी करून त्यानंतर अर्जदाराची चौकशी केली जाते. यानंतर सर्व काही बरोबर असल्याचे लक्षात आल्यावर घर बांधण्यासाठी फक्त आर्थिक मदत मिळते.

योजनेसाठी लागणारे कागदपत्र

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhaar Card), मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, रेशन कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT