Senior Citizen Pension Schemes: उतारवयातील पैशांचं नियोजन आजच करा, 4 पेन्शन योजना म्हातारपणी देतील आर्थिक आधार

Central Government Schemes: वयात आल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते की, त्यांनी गुंतवणूक करावी. ज्यामुळे भविष्य सुरक्षित राहील
Senior Citizen Pension Schemes
Senior Citizen Pension SchemesSaam Tv
Published On

Pension Schemes :

उतारवयात प्रत्येकाला आपल्या उर्वरित आयुष्याची चिंता सतावत असते. वयात आल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते की, त्यांनी गुंतवणूक करावी. ज्यामुळे भविष्य सुरक्षित राहील. यासाठी लोक विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. जेणे करुन त्याचा योग्य परतावा मिळेल.

अशा अनेक सरकारी योजना आहेत ज्यात आपण गुंतवणूक करुन म्हातारपणी त्यातून आपल्याला पेन्शन मिळू शकते. सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना चालवत आहे, ज्यामध्ये पेन्शन, आरोग्य सेवा आणि सेवानिवृत्तीचे फायदे दिले जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्ती वेतन योजना सर्वात प्रभावी मानल्या जातात. या योजनांतर्गत नियमित उत्पन्नामुळे वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळते. सरकारने सुरू केलेल्या चार पेन्शन योजनांची माहिती येथे दिली आहे.

Senior Citizen Pension Schemes
Famous Hill Station In Satara: डोळ्यांचं पारणं फेडणारं साताऱ्यातील हिल स्टेशन, निसर्गाचं विलोभनीय दृश्य पाहा

1. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली

केंद्र सरकारने (Government) सुरू केलेली राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (NPS) ही सेवानिवृत्तीसाठी बचत आणि गुंतवणूक योजना आहे. ही दीर्घकालीन बचत योजना असून, जी बाजारावर आधारित परतावा देते. ही पेन्शन (Pension) योजना पीएफआरडीएद्वारे चालवली जात आहे. वृद्धापकाळात नियमित मिळकत आणि निवृत्तीनंतर अधिक निधी या दोन्हींचा लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत, कोणताही नागरिक 60 ते 65 वर्षांच्या दरम्यान गुंतवणूक (Investment) करू शकतो आणि वयाच्या 70 वर्षापर्यंत सदस्य राहू शकतो.

Senior Citizen Pension Schemes
Atal Pension Yojana: उतारवयात पैशांची चणचण भासणार नाहीच! 210 रुपयांची गुंतवणूक करा; महिन्याला 5000 ची पेन्शन मिळवा, कसे ते जाणून घ्या

2. इंदिरा गांधी राष्ट्रीय जुनी पेन्शन योजना

या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन दिली जाते. ६० ते ७९ वयोगटातील ज्येष्ठ नागरिक बीपीएल श्रेणीतील नागरिक मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. या अंतर्गत 300 रुपये आणि वयाच्या 80 व्या वर्षी 500 रुपये दिले जातात.

3. अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना पेन्शनचा लाभ दिला जातो. याअंतर्गत 1 हजार 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन दिली जाते. भारतातील नागरिक 18 ते 40 वर्षे वयापर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

4. वरिष्ठ पेन्शन विमा योजना

वित्त सेवा विभागाच्या वेबसाइटनुसार, वरिष्ठ पेन्शन विमा योजना LIC द्वारे चालविली जाते. या अंतर्गत तुमच्या एकरकमी रकमेवर मासिक पेन्शनचा लाभ दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com