उन्हाळ्यात सामान्यपणे डोळ्याच्या समस्या अधिक प्रमाणात उद्भवतात. यामध्ये डोळं येणं ज्याला सामान्यपणे 'पिंक आय' म्हटलं जातं. ही समस्या डोळ्याच्या आतील पापणीचा आणि डोळ्याच्या पांढऱ्या भागाचा आच्छादन करणाऱ्या पारदर्शक पातळ ऊतींच्या थराचा दाह मानला जातो. उन्हाळ्याच्या महिन्यांत, पर्यावरणीय घटकांच्या एकत्रित परिणामामुळे डोळे येण्याच्या समस्या वाढतात.
मुंबईतील ओजस मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल्समधील MBBS, MS (ऑप्थेल्मोलॉजी), FVRS रेटिना वरिष्ठ सल्लागार नेत्रतज्ज्ञ डॉ. रोहन एन. देधिया यांनी सांगितलं की, उन्हाळ्यात, डोळे येणं विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य संसर्ग, अॅलर्जन्स घटकांमुळे उद्भवू शकतो. विषाणूजन्य डोळे येणं सर्वाधिक सामान्य असून अत्यंत संसर्गजन्य आहे. हे मुख्यतः तलावातील दूषित पाण्याच्या संपर्कातून किंवा अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श केल्याने पसरतो.
जीवाणूजन्य डोळे येणं देखील थेट संपर्कातून पसरतो आणि तो अपुरी स्वच्छता किंवा सामायिक टॉवेल्स आणि सौंदर्यप्रसाधने वापरण्यामुळे होतो. अॅलर्जिक डोळे येणं मात्र, गरम हवामानात वाढलेले परागकण, धूळ किंवा वायू प्रदूषणामुळे होतो. अतिप्रमाणात सूर्यप्रकाश आणि घाम यांचाही डोळ्यांवर परिणाम होतो, ज्यामुळे डोळे येण्यासारखी समस्या उद्भवते
लक्षणं काय दिसून येतात?
नेहमीची लक्षणं म्हणजे डोळे लाल होणं, खाज येणं, जळजळ होणं, अधिक प्रमाणात पाणी येणंआणि डोळ्यात कचकच होणं. डोळ्यांमधून येणारा स्त्राव—विषाणूजन्य प्रकरणांमध्ये पारदर्शक आणि पाणचट, तर जीवाणूजन्य प्रकरणांमध्ये पिवळसर किंवा हिरवट आणि चिकट हे आणखी एक महत्त्वाचं लक्षण आहे. अॅलर्जिक डोळे येण्यामध्ये सामान्यतः दोन्ही डोळ्यांत तीव्र खाज आणि पापण्या सूजलेल्या दिसतात.
डोळ्यांच्या समस्यांचे उपचार हे कारणावर अवलंबून असतात. विषाणूजन्य डोळे येणं सहसा एक ते दोन आठवड्यांत आपोआप बरे होतात. थंड पट्ट्या आणि डोळ्यांचे लुब्रिकंट डॉप अस्वस्थता कमी करतात. जीवाणूजन्य डोळे येण्यासाठी डोळ्यांचे अँटिबायोटिक ड्रॉप्स किंवा मलम आवश्यक असतं. अॅलर्जिक डोळे येणे यासाठी डोळ्यांचे अँटीहिस्टामिन किंवा अँटी-इन्फ्लेमेटरी ड्रॉप्स सामान्यतः सुचवले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.