Physical Relation Saam TV
लाईफस्टाईल

Physical Relation: लैंगिक आयुष्यातील शत्रू...

आनंदी आणि सुखी जीवनासाठी शरीर संबंध व्यवस्थित असणे अधिक गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

Physical Relation : बदलेली व व्यस्त जीवनशैली, कामाचा तणाव व इतर गोष्टींमुळे नात्यात अनेक अडचणी येतात. हल्ली लैंगिक जीवन सुखाने जगणारे कपल्स हे कमी आहेत. अधिकतर जोडप्यांमध्ये या गोष्टींमुळे वाद निर्माण होतो किंवा संभोग करण्यास ते अधिक पसंती देत नाही.

आनंदी आणि सुखी जीवनासाठी शरीर संबंध व्यवस्थित असणे अधिक गरजेचे आहे. शारीरिक संबंध ठेवणे ही वैवाहिक जीवनातील महत्त्वाची आणि सामान्य बाब आहे. या विषयावर बोलताना अधिकतर जोडपे लाजतात किंवा टाळतात. परंतु, आपल्या जोडीदाराला शारीरिक संबंधाविषयी नेमके काय वाटते हे जाणून घेणे अधिक गरजेचे आहे. त्याचा आपल्या लैंगिक जीवनावर कसा परिणाम होतो व याचे शत्रू कोण हे जाणून घेऊया.

1. ताण

लैंगिक जीवन असो किंवा आपल्या सामान्य जीवनातील ताणतणाव प्रत्येक गोष्टीवर खूप परिणाम करतात. तणावामुळे लैंगिक इच्छा निर्माण करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो, ज्यामुळे तुमची सेक्सची इच्छा कमी होते.

2. दूरदर्शन

दूरदर्शन केवळ आपले मनोरंजन करत नाही तर आपल्या लैंगिक जीवनावर त्याचा परिणाम होतो. कारण अनेक वेळा यात दाखवण्यात आलेल्या हिंसक किंवा भावनिक शोजमुळे तणावाची पातळी वाढते, ज्याचा सेक्सवर खूप वाईट परिणाम होतो.

3. सतत काम करणे

कधीतरी ओव्हरटाईम काम करणे योग्य असते परंतु, ते आपल्या दैनंदिन दिनचर्येत कधीही समाविष्ट करू नका. जर तुम्ही रोज उशीरा घरी पोहोचलात तर तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांवर याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही तिथे जास्त काम केले तर थकवा आणि ताण (Stress) जास्त येतो. त्याचा परिणाम आपल्या लैंगिक जीवनावर होतो.

4. वेळ न देणे

लग्नानंतर अनेकदा जोडप्यांची विचारसरणी थोडी अनरोमँटिक बनते. यामुळे तुमच्या पार्टनरला वाटते की तुम्ही त्यांच्यासोबत कंटाळले आहात. तुमच्या पार्टनरला स्पेशल वाटेल अशी काही खास गरज नाही. तुमच्या जोडीदाराप्रती हा अनौपचारिक दृष्टीकोन तुमचा सर्वात वाईट शत्रू आहे.

5. नात्यात भावनिकतेची कमतरता

सेक्स ही केवळ आपली शारीरिक गरज नसून ती थेट आपल्या मनाशी संबंधित आहे. त्यामुळे जर तुमची तुमच्या जोडीदाराशी भावनिकरित्या आपण जोडले नसू तर तुम्ही सेक्सचा आनंद घेऊ शकणार नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर जोडीदाराचा अपमान करत असाल किंवा त्याकडे दुर्लक्ष करत असाल आणि नंतर लैंगिक संबंधात त्याच्याकडून तुम्हाला सहकार्य करण्याची अपेक्षा असेल तर हे शक्य नाही.

6. गरजांची काळजी घ्या

तुमचा मूड असेल तर तुम्हाला सेक्स करायचा आहे, जोडीदाराचा मूड किंवा त्याची तब्येत किंवा त्याला मानसिक समस्या असली तरी या गोष्टींकडे लक्ष न देता तुम्ही सेक्स संबंधित इच्छा व्यक्त करणे चुक आहे. यामुळे तुम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही व तुमच्या सेक्स लाईफचे हे शत्रू बनू शकतात.

7. फोरप्ले न करणे

बहुतेक पुरुष एकतर फोरप्ले अजिबात करत नाहीत किंवा फारच कमी करतात, ज्यामुळे त्यांचा पार्टनर सेक्ससाठी पूर्णपणे तयार नसतो आणि जर असेच वागणे चालू राहिले तर नंतर पार्टनर (Partner) सेक्सपासून दूर जाऊ लागतो, कारण यामुळे त्याच्यासाठी सेक्स आनंददायीपेक्षा तो अधिक वेदनादायक बनतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT