Benefits Of Dal : पुरुषांसाठी वरदान आहे 'ही' डाळ, या पध्दतीने सेवन केल्यास लैंगिक जीवन होईल सुखकर !

आपल्या इतर आजारांसोबतच लैंगिक जीवनातील अडचणींना सामोरे जावे लागते.
Benefits Of Dal
Benefits Of DalSaam TV
Published On

Benefits Of Dal : चांगल्या आरोग्यासाठी आपण अनेक पदार्थांचे सेवन करतो. त्यात जर वैवाहिक आयुष्यातील अडचणी असतील तर आपण अशा काही पदार्थांचे सेवन करतो ज्यामुळे ते सुखकर होईल.

गरम गरम वरण भातावर तूपाची धार ही हल्ली कमी खाल्ली जाते. जंक फूडच्या सेवनाने आपल्याला आहारातील डाळीचे सेवन कमी झाले आहे. त्यामुळे आपल्या इतर आजारांसोबतच लैंगिक जीवनातील अडचणींना सामोरे जावे लागते.

काहींना असे वाटते शरीराला हवे असणारे घटक हे मासांहरी पदार्थातूनच मिळू शकतात. त्यामुळे मासांहरी पदार्थांचे सेवन हे अतिप्रमाणात केले जाते. परंतु, डाळीत मिळणारे पोषक घटक हे मासांहरातून मिळत नाही.

Benefits Of Dal
Male Condom Mistakes : निरोध वापरताना 'या' चुका करताय? होऊ शकतो भयंकर आजार

पण जे लोक शाकाहारी आहेत, त्यांना अनेकदा त्यांच्या आरोग्याची काळजी असते. अशा लोकांसाठी डाळी हा आरोग्याचा (Health) सर्वात मोठा खजिना आहे. तूर, उडीद, मूग डाळ अशा अनेक प्रकारच्या डाळी आहेत. या सर्वांचे स्वतःचे महत्त्व आहे, परंतु उडदाची काळी मसूर ही पुरुषांसाठी वरदान मानली जाते, जी सर्वांनाच माहीत नसेल.

अनेकांना असे वाटते की, उडदाच्या डाळीमुळे अपचनाची समस्या निर्माण होते. त्यामुळे तिला खाण्यास टाळले जाते. उडदाची डाळ ही पुरुषांसाठी बहुगुणी मानली जाते. आपल्या देशात सर्व प्रकारच्या डाळी आढळतात. ज्यात सर्वाधिक उत्पादन हे उडीद डाळीचे केले जाते. ही डाळ सालीसह व सालीशिवायही खाल्ली जाते.

- उडीद डाळीचे फायदे

उडदाची काळी डाळ ही सर्व डाळींच्या तुलनेत अत्यंत मजबूत आणि पौष्टिक असते. माहितीनुसार, ही नाडी वीर्य वाढवणारी म्हणजेच पुरुषांच्या शरीरातील वीर्य वाढवणारी आहे. ज्यामुळे पुरुषांची ही कमजोरी दूर करु शकते. पुरुषांच्या हृदयासाठीही हे खूप फायदेशीर (Benefits) आहे. यामध्ये पुरूषांचे शरीर मजबूत करण्यासाठी अनेक पोषक तत्वे असतात.

उडदाची काळी डाळ पाण्यात ६ ते ७ तास भिजत ठेवा. यानंतर देसी तुपात तळून दररोज मधासोबत खाल्ल्यास पुरुषांची आंतरिक शक्ती वाढते आणि लैंगिक समस्यांशी संबंधित सर्व समस्याही दूर होतात. ही डाळ पुरुषांमधील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

Benefits Of Dal
Physical Relation: लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी पुरुष करतात 'या' चुका, जोडीदारावर होतो विपरीत परिणाम

- महिलांसाठी फायदेशीर

उडदाच्या डाळीमध्ये भरपूर लोह असते, जे शरीरासाठी फायदेशीर असते. महिलांसाठीही ही कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. ज्या मुली/स्त्रियांना मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव किंवा त्रास होतो, त्यांनी ही डाळ जरूर खावी. असे म्हटले जाते की यामध्ये लाल मांसापेक्षा जास्त लोह असते. उडीद डाळीचा पॅक लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होते आणि चेहऱ्यावर चमकही येते. एक प्रकारे, उडीद डाळ ही महिला आणि पुरुषांसाठी पोषक तत्वांचा खजिना आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com