Physical Relationship Saam TV
लाईफस्टाईल

Physical Relationship : लैंगिक संबंध अधिक मजेशीर बनवण्यासाठी, पुरुषांनी 'हे' नक्की करायला हवे !

हल्लीच्या जीवनशैलीत प्रेम आणि लैंगिक संबंध ठेवणे ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे.

कोमल दामुद्रे

Physical Relationship : प्रत्येक नात्यात हा गोडवा हवाच ! मग तो शब्दांनी असो किंवा प्रेमाने. हल्लीच्या जीवनशैलीत प्रेम आणि लैंगिक संबंध ठेवणे ही गोष्ट साहाजिकच आहे. प्रेम करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला असे वाटते की, आपला जोडीदार (Partner) शरीर संबंधातून अधिक खूश होतो पण काही वेळेस असे होते की, आपल्याला वाईट वाटू नये म्हणून स्त्रिया याविषयी आपल्या जोडीदाराशी बोलणे टाळतात.

अनेक वेळा कामाच्या ओझ्यामुळे किंवा कंटाळवाण्या लैंगिक जीवनामुळे लोकांच्या वैवाहिक जीवनात तणाव दिसू लागतो. जोडीदारासोबत वेळ न घालवल्यामुळे किंवा बाह्य तणावामुळे लैंगिक जीवनावरही परिणाम होतो, परंतु आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips) देणार आहोत ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल. (Latest Marathi News)

वैवाहिक जीवन सुखकर करण्यासाठी स्त्री किंवा पुरुष दोघांची महत्त्वाची भूमिका आहे, परंतु जर ते लैंगिक संबंधाचे असेल तर यात पुरुषाची जबाबदारी अधिक असते. कारण महिलांसाठी सेक्स तेव्हाच आनंददायी ठरतो जेव्हा पुरुष असे वातावरण निर्माण करतात ज्यामध्ये त्यांना उत्साह वाटतो. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की, स्त्रियांना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पुरेसा वेळ लागतो. चला तर मग जाणून घेऊया पुरुषांनी अंथरुणावर जाण्यापूर्वी काय करायला हवे .

अंथरुणावर जाण्यापूर्वी पुरुषांनी हे करायला हवे -

  • जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जवळीक साधण्याचा विचार करत असाल तर त्याला याची माहिती नक्कीच द्या. अचानक लैंगिक संबंधाचा ठेवण्याचा विचार केल्यास स्त्रिया फारसे उत्तेजित होत नाही.

  • झोपण्यापूर्वी जोडीदारासोबत गप्पा मारा व असे वातावरण निर्माण करा की, लैंगिक संबंध ठेवताना अधिक सोपे जाईल.

  • खोलीत प्रकाश मंद ठेवा, तुम्ही हलक्या संगीतासह कॉकटेल किंवा मॉकटेलचा आनंद घेऊ शकता.

  • पुरुषांनी लक्षात घ्या की, जर पुढाकार स्त्रीच्या बाजूने असेल तर तुम्ही तिचा आदर केला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा ताण स्वतः दूर करून त्या क्षणाचा आनंद घ्यावा.

  • जेवल्यानंतर लगेच झोपायला जाऊ नका, परंतु या काळात एक लहान आणि रोमँटिक वॉक करा आणि तुमच्या जोडीदाराशी रोमँटिक चर्चा करा.

  • पुरुषांनी याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे की जर जोडीदार थकलेला असेल किंवा तणावात असेल तर त्याला आराम करु द्या. त्याचा तणाव दूर करण्यासाठी प्रेमळ मसाज केल्याने तुमचे लैंगिक जीवन अधिक आनंददायी होईल.

  • जेव्हा तुम्ही मूडमध्ये असता तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला आवडत्या सुगंधाने किंवा खोलीतील संगीतानेही ते सूचित करा.

तर या टिप्स फॉलो करा आणि तुमचे कंटाळवाणे वैवाहिक जीवन देखील आनंददायक बनवू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

World Hepatitis Day: हिपॅटायटीस टाळण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा

SCROLL FOR NEXT