Love Life Tips : प्रेमीयुगलांनो लव बाइट्सचे निशाण हटवण्यासाठी उपयोगी पडतील 'हे' उपाय

त्वचेवर पडलेले लाल चट्टे, बाइट्सचे निशाण हे लाल व गडद दिसू लागले की, बरेचदा आपल्याला तिथे जळजळ होऊ लागते.
Love Life Tips
Love Life TipsSaam Tv
Published On

Love Life Tips : प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक वेगवेगळया भावना असतात. कोणत्याही नात्याचा धागा हा त्यांच्या प्रेमावर अवलंबून असतो. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी बऱ्याचदा जोडप्यांना शरीर संबंध ठेवाण्याची गरज वाटते.

प्रेमात गुंतलेली जोडपी ही अनेकदा शरीर संबंध ठेवल्यानंतर अस्वस्थ होतात. आपली भावना व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या प्रेमाची निशाणी सोडण्यासाठी ते बरेचदा लव बाइट्स देतात. गळ्यात, चेहऱ्यावर (Skin) किंवा कानाभोवती लव्ह बाइट दिसू लागतात.

Love Life Tips
Hormonals Issue : महिलांनो, लैगिंक संबंध ठेवताना पुरुषांमध्ये दिसते का? हार्मोन्सची कमतरता; 'ही' आहेत त्याची लक्षणे

परंतु, कामाच्या (Office) ठिकाणी किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यात हे लव बाइट्स आपल्याला अधिक त्रास देऊ लागतात. त्वचेवर पडलेले लाल चट्टे, बाइट्सचे निशाण हे लाल व गडद दिसू लागले की, बरेचदा आपल्याला तिथे जळजळ होऊ लागते. आपल्या जोडीदाराकडून मिळाला सुखद पण गोड अनुभव प्रत्येकालाच जपून ठेवावासा वाटतो. पण तो कोणाला दिसू नये यासाठी देखील अनेक प्रयत्न केले जातात.

जेव्हा जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागावर चुंबन जोरदारपणे केले जाते तेव्हा एक लव्ह बाईट होतो. त्याला चुंबन चिन्ह देखील म्हणतात. त्वचेवर दीर्घकाळ चुंबन केल्याने तेथे रक्त साचते आणि निळे, तपकिरी किंवा लाल रंगाचे चिन्ह तयार होते. चला तर मग जाणून घेऊया लव्ह बाइट गायब करण्याचे सोपे उपाय कोणते आहेत.

१. अल्कोहोल हे जीवाणू मुक्त आहे. तुम्ही ते काही काळ फ्रीजरमध्ये ठेवा आणि लव बाइट्सच्या भागावर हलकेच घासून घ्या. अल्कोहोलमुळे हे डाग झपाट्याने गायब होतील. अल्कोहोल सुकल्यानंतर, डागांवर मॉइश्चरायझर लावा.

२. जर अल्कोहोल नसेल तर साध्या पाण्यात मीठ मिसळा आणि फ्रीजरमध्ये ठेवा. बर्फ तयार झाल्यावर बाइट्सवर मसाज करा. यामुळे गोठलेले रक्त दूर होईल व डाग नाहीसे होतील.

Love Life Tips
Benefits Of Foreplay : लैंगिक संबंधात फोरप्ले हा हवाच ! जाणून घ्या, नात्यात त्याचा कसा फायदा होतो

३. केळीची साल लव बाईटच्या ठिकाणी ठेवून मसाज करा. याच्या सालीमध्ये ल्युटीन नावाचे तत्व असते, जे लव्ह बाईटच्या खुणा सहज काढून टाकते.

४. शरीरातील कोणत्याही भागा जवळ रक्त जमा झाल्यास हीटिंग पॅडचा वापर केला जातो. लव बाइट्सच्या ठिकाणी हीटिंग पॅड लावल्याने रक्ताभिसरण सुरळीत होईल व डाग निघून जाईल.

५. याशिवाय, तुम्ही पुदिना आणि कोरफड सुद्धा थंड करून प्रभावित त्वचेवर ठेवू शकता. फक्त ते घासू नका हे लक्षात ठेवा, हलक्या हाताने काढण्याचा प्रयत्न करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com