Benefits Of Foreplay : लैंगिक संबंधात फोरप्ले हा हवाच ! जाणून घ्या, नात्यात त्याचा कसा फायदा होतो

लैंगिक संभोगाच्या आधी लैंगिक उत्तेजनामध्ये फोरप्ले केवळ महत्त्वाची भूमिका बजावत नाही, तर पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
Relationship Tips
Relationship TipsSaam Tv

Benefits Of Foreplay : सुंदर नात्यासाठी आपण आपल्या जोडीदाराशी संवाद साधणे अधिक गरजेचे आहे. नाते अधिक चांगले बनवण्यासाठी फक्त प्रेमच पुरेसे नसते तर, त्यात भावनिक व शारीरिक जवळीक साधणे देखील महत्त्वाचे आहे.

आपल्यापैकी बऱ्याच जोडीदारांना फोरप्ले म्हणजे काय किंवा त्याची भूमिका कशी बजावली जाते हे माहित नसते. परंतु, संभोगाच्या आधी उत्तेजनामध्ये फोरप्ले केवळ महत्त्वाची भूमिका बजावत नाही. तर पुरुष आणि स्त्रिया (Female) दोघांच्याही नात्यासाठी त्यांचे शारीरिक व भावनिक स्वरुपाचे नाते असणे अधिक फायदेशीर आहे.

संभोगाच्या बाबतीत स्त्री व पुरुष या दोघांच्याही गरजा निरनिराळ्या असू शकतात. पुरुषांना संभोगाची क्रिया करण्यापूर्वी थोडा वेळ घेणे आवडते. सहाजिकच, त्यामुळे पुरुषांना लैगिंक संबंधापूर्वी फोरप्ले करुन स्त्रीला उत्तेजित करता येते,असे वाटत असते. हे जोडप्यांमधील जवळीकता वाढवते आणि अनेकदा दोघांना त्यातून समधान मिळते.

फोरप्ले हे लैंगिकप्रवेशापूर्वी मिळणार्‍या आनंदावर लक्ष केंद्रित करते, जे शरीराला प्रवेश किंवा ओरल संभोगामधून जास्तीत जास्त आनंद मिळविण्यासाठी तयार करते. चला तर मग, लैंगिक संबंध ठेवताना फोरप्लेचे फायदे कसे होतात हे जाणून घ्या

Relationship Tips
Hormonals Issue : महिलांनो, लैगिंक संबंध ठेवताना पुरुषांमध्ये दिसते का? हार्मोन्सची कमतरता; 'ही' आहेत त्याची लक्षणे

कामोत्तेजनापर्यंत पोहोचण्याची उत्तम शक्यता -

फोरप्ले शरीराला आनंद देतो. जेव्हा चुंबन घेणे, पकडणे आणि स्पर्श करणे खूप वेळा होते तेव्हाचा आनंद हा कमालीचा असतो. अशाप्रकारे फारसा त्रास न होता सहजपणे कामोत्तेजनापर्यंत जोडीदारला पोहोचवू शकतो.

भावनिक जोड -

फोरप्ले ही दोन जोडीदारांमधील अतिशय जिव्हाळ्याची क्रिया आहे. हे एखाद्याला सखोल शारीरिक आणि भावनिक पातळीवर जोडण्यास मदत करते. तर या काळात लैंगिक प्रवेश केवळ शारीरिक सुखासाठी असू शकतो. फोरप्ले जोडीदाराला भावनिकरित्या जोडतो कारण, दोघेही एकमेकांच्या खूप जवळ असतात.

महिलांसाठी सुंदर क्षण -

हे गुपित नाही की, महिलांना भावनोत्कटता येण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे फोरप्लेने संभोग सुरू केल्याने महिलांना उत्तेजित होण्यास अधिक वेळ मिळतो. फोरप्ले जितका लांब आणि तीव्र असेल तितकी महिलांना कामोत्तेजना मिळण्याची शक्यता जास्त असते.

जोडीदारांमधील उत्तम संवाद -

फोरप्ले जोडीदारांना त्यांच्या गरजांबद्दल एकमेकांशी संवाद साधण्यास अनुमती देते. काय करायला आवडते आणि काय नाही हे पार्टनरला सांगू शकता. अशा प्रकारे दोघांमधील अधिक चांगल्या संवादाला प्रेरणा देऊ शकतात.

Relationship Tips
How to Increase Sex Stamina : लैंगिक संबंधांची क्षमता वाढवायची आहे? 'या' पेयाचे सेवन करा

फोरप्लेचे वेगवेगळे मार्ग -

जोडीदाराला उत्तेजित करण्यासाठी फोरप्लेची मदत आपण घेऊ शकतो. यासाठी कोणत्याही विचित्र विषयावर आपण आपल्या जोडीदाराशी बोलू शकतो किंवा इतर गोष्टींची मदत घेऊ शकतो. या अतिरिक्त फोरप्ले संभोगाच्या क्षणांना आणखी सुंदर बनवू शकतो.

किती वेळा फोरप्ले करावा -

एखादी व्यक्ती जितक्या वेळा संभोग करते तितक्या वेळा फोरप्ले करू शकते. तथापि, हे खूप वेळा करू नका कारण एका वेळेनंतर फोरप्ले खरोखरच कंटाळवाणा आणि नीरस होऊ शकतो. आश्चर्यकारकपणे उत्तेजित आणि कामुक वाटण्यासाठी ते सतत वाढवणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com