Covid-19 Saam Tv
लाईफस्टाईल

Covid-19 : कोरोनामुळे उद्भवतात अनेक दीर्घकालीन शारीरिक समस्या, रिसर्चमधून धक्कादायक माहिती उघड

Corona Variant JN.1 : देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या महामारीने डोके वर काढले आहे. राज्यात अनेक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे नागरिकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुणे, ठाणे आणि नाशिकमध्ये नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत.

कोमल दामुद्रे

Corona JN. 1 Symptoms :

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या महामारीने डोके वर काढले आहे. राज्यात अनेक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे नागरिकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुणे, ठाणे आणि नाशिकमध्ये नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाचा (Corona) नवा व्हेरिएंट हा अधिक घातक जरी नसला तरी, त्याच्या लक्षणांमुळे अनेक रुग्ण देशभरात सापडत आहे. तसेच यापूर्वी कोविडची लस किंवा बूस्टर डोस घेतलेल्या लोकांमध्येही याची लक्षणे (Symptoms) दिसून येऊ शकतात. जर तुम्हाला कोविडची लक्षणे सौम्य दिसत असली तरी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोरोनामुळे अनेक दीर्घकालीन शारीरिक समस्यांना समोरे जावे लागते आहे अशी धक्कादायक माहितीसमोर आली आहे. मेरिकन मेडिकल असोसिएशन पॉडकास्टमध्ये डॉक्टर रॅम्बोड रूहबख्श यांनी म्हटले की, कोविड होऊन गेल्यानंतर रुग्णाला मधुमेह (Diabetes), मूत्रपिंडाचा आजार, अवयव निकामी होणे आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

रिसर्चनुसार ६५ दशलक्ष लोक सध्या कोविडच्या आजाराने त्रस्त आहेत. परंतु, यामध्ये मुलांचा समावेश कमी प्रमाणात आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉन नंतरच्या प्रकारांमध्ये पुन्हा संसर्ग झाल्यानंतर कोविडमध्ये वाढ झाल्याचेही लक्षात आले आहे. कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे.

1. Corona Variant JN.1 लक्षणे कोणती?

तज्ज्ञांच्या मते कोविड १९ च्या वेगवेगळ्या प्रकारामुळे लक्षणांमध्ये सौम्य बदल पाहायला मिळत आहे. युनायटेड किंगडमच्या मते आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोविड कोविड-१९ ची नवीन लक्षणे कोणती ती जाणून घेऊया

  • नाक गळती

  • सर्दी

  • खोकला

  • डोकेदुखी

  • अशक्तपणा आणि थकवा

  • स्नायू दुखणे

  • घसा खवखवणे

  • निद्रानाशाची समस्या

  • चिंता

सध्या हिवाळा सुरु असल्यामुळे श्वसनांच्या संबंधित अनेक रोगांची लागण झालेली पाहायला मिळत आहे. खोकला, घसा खवखवणे, शिंका येणे, थकवा आणि डोकेदुखी ही सर्वात सामान्य लक्षणे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

SCROLL FOR NEXT