how to take professional photos with a smartphone camera saam tv
लाईफस्टाईल

Mobile Photography : कॅमेरा असो वा नसो, 'या' सोप्या ट्रिक्सने मोबाईलच्या क्लिकवर काढा स्टायलिश आणि क्लिअर फोटो

smartphone camera tips : दिवाळीच्या दिवशी स्मार्टफोनने सुंदर आणि आकर्षक फोटो क्लिक करायचे असतील, तर त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता.

Saam Tv

दिवाळी म्हटली की कंदील, पणत्या, रोषणाई आणि सुंदर आठवणी मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्याची लगबग सुरू होते. पण अनेकदा अंधारात फोटो काढताना ते हवे तसे क्लिअर येत नाहीत. जर तुम्हालाही या दिवाळीत महागड्या कॅमेऱ्याशिवाय अगदी साध्या स्मार्टफोननेच एकदम प्रोफेशनल आणि भन्नाट फोटो काढायचे असतील, तर थोडेसे योग्य अँगल आणि सेटिंग्ज बदलून तुम्ही तुमच्या दिवाळीच्या फोटोंमध्ये चार चाँद लावून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता.

मोबाईलवर दिवाळीचे भारी फोटो काढण्यासाठी सोप्या टिप्स:

फ्लॅश मारणे टाळा

अंधारात किंवा रोषणाईत फोटो काढताना मोबाईलचा फ्लॅश ऑन करू नका. यामुळे फोटोमधील नैसर्गिक चमक आणि दिव्यांचा प्रकाश बिघडू शकतो.

नाईट मोड वापरा

तुमच्या फोनमध्ये 'नाईट मोड' चे फिचर असेल तर त्याचा नक्की वापर करा. यामुळे कमी प्रकाशातही फोटो खूप क्लिअर आणि ब्राईट येतात. नाईट मोड वापरताना फोन अजिबात हलवू नका, अन्यथा फोटो ब्लर होऊ शकतो.

एक्स्पोजर कंट्रोल करा

स्क्रीनवर जिथे प्रकाश जास्त असेल तिथे टॅप करून मॅन्युअली एक्स्पोजर थोडे कमी करा. यामुळे दिव्यांचा प्रकाश आणि डिझाइन आणखी उठावदार दिसेल.

पोर्ट्रेट मोडचा वापर

कंदिलाच, पणत्या किंवा सुंदर रांगोळीचे क्लोज-अप फोटो काढताना पोर्ट्रेट मोड वापरा. यामुळे बॅकग्राउंड ब्लर होऊन मुख्य वस्तू आकर्षित आणि सुंदर दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन वेळा एका मताने विजय, तिसऱ्या मतमोजणीत मोठा ट्विस्ट; निकालाची राजकीय वर्तुळात चर्चा

Lost Wedding Ring: 83 वर्षांपूर्वी हरवलेली लग्नाची अंगठी सापडली; थेट कुटुंबीयांच्या हातात दिली, नेमकं काय घडलं?

Healthy Lifestyle : शौचास बसताना तुम्हीही करता का 'ही' चूक? आजच सुधारा नाहीतर आयुष्यात येईल भयानक संकट

Rinku Rajguru: जांभळ्या साडीत रिंकू राजगुरुचा शाही थाट! मराठमोळ्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Maharashtra News Live Update: दिवाळीच्या निमित्ताने कांदिवली पोलिसांना मोठे यश

SCROLL FOR NEXT