Pediatric Heart Disease saam tv
लाईफस्टाईल

Pediatric Heart Disease: हृदयविकाराचा त्रास असलेल्या 619 बालरुग्णांना मिळालं नवं आयुष्य; उभारला 10 कोटी रुपयांचा निधी

Pediatric heart disease fund: देशात बालकांमध्ये वाढणारे हृदयविकार (Pediatric Heart Disease) एक मोठी समस्या बनत आहेत. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास अनेक बालकांचा जीव धोक्यात येतो.

Surabhi Jayashree Jagdish

नवी मुंबईतील खारघरमध्ये असलेल्या श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरमध्ये गेल्या काही वर्षांत जन्मजात हृदयविकाराने त्रस्त असलेल्या ६१९ मुलांवर यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या सर्व मुलांना आता निरोगी जीवनाची नवी संधी मिळाली आहे. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला असून, ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ या प्रकल्पासाठी अध्यक्ष पीपी नितीन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. याच निधीतून सर्व शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.

या आनंदाच्या क्षणांचा उत्सव साजरा करण्यासाठी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी स्वतः रुग्णालयात येऊन लहानग्या रुग्णांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घेतली. गावस्कर यांनी या मुलांच्या धैर्याचे कौतुक करताना, रुग्णालय व रोटरी क्लबच्या सेवाभावाला सलाम केला.

जन्मजात हृदयविकार हे आव्हान

बालकांमध्ये आढळणारे जन्मजात हृदयविकार हे अतिशय गुंतागुंतीचे असतात. हृदयातील छिद्र, झडपांच्या समस्या किंवा रक्तवाहिन्यांच्या रचनेतील बिघाड अशा कारणांमुळे अनेक लहानग्यांना शस्त्रक्रियेची गरज भासते. उपचारात विलंब झाल्यास दम लागणे, शारीरिक वाढ थांबणं, सतत संसर्ग होणं आणि अगदी अकाली मृत्यू अशा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकतात.

दरवर्षी भारतात अंदाजे २ लाख मुलं अशा विकारांसह जन्माला येतात. त्यापैकी सुमारे ७०,००० मुलांना पहिल्याच वर्षात शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. पण आर्थिक अडचणी आणि माहितीअभावी अनेकांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत.

मानवतेचा अनमोल ठेवा ‘गिफ्ट ऑफ लाईफ’

प्रकल्पाचे अध्यक्ष पीपी नितीन मेहता सांगतात, “प्रत्येक मुलाला निरोगी हृदय घेऊन जगण्याचा हक्क आहे. देशात हजारो कुटुंबं आहेत ज्यांना उपचारांचा खर्च परवडत नाही आणि त्यामुळे लहानग्यांना आयुष्यभर आजाराशी झुंज द्यावी लागते. आमच्या उपक्रमातून आम्ही या मुलांपर्यंत पोहोचतो, त्यांना उपचार मिळवून देतो. शस्त्रक्रियेनंतर एखादं मूल हसताना दिसलं, तर तो क्षण आमच्यासाठी अनमोल ठरतो.”

निदान होण्याची गरज

रुग्णालयातील बालहृदय शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभात रश्मी सांगतात की, अशा विकारांसह जन्माला येणारी बाळं अनेकदा अशक्त दिसतात, त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, पुरेसा आहार घेता येत नाही किंवा ऑक्सिजन कमी झाल्याने त्वचा निळसर होते. त्वरित निदान आणि उपचार न झाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जन्मानंतर लगेच होणारं स्क्रीनिंग, इकोकार्डियोग्रामसारख्या तपासण्या आणि वेळेवर उपचार या सर्व गोष्टी मुलाच्या आयुष्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवतात.

योग्य वेळी उपचार बदलेलं आयुष्य

या समारंभात उपस्थित राहून गावस्कर म्हणाले, “या धाडसी मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटून मी भावूक झालं. त्यांचा आत्मविश्वास आणि रुग्णालय आणि रोटरी क्लबचा निस्वार्थ सेवाभाव हा खरोखरच प्रेरणादायी आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्यास आयुष्य बदलू शकतं, हे मी इथे पाहिलं.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1947 Grocery Price: साखर, मीठ, तेल आणि सोनं...१९४७ मध्ये 'या' गोष्टींची किंमत किती होती?

Maharashtra Live Update: अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे ५ उपाय, घरात नांदेल सुख- शांती

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT