New cancer diagnosis method: आता केवळ आवाजाने समजणार तुम्हाला कॅन्सर झालाय ते; शास्त्रज्ञांनी शोधली नवी पद्धत

Cancer diagnosis: एका नवीन संशोधनामुळे कॅन्सरचे (Cancer) निदान करणे अधिक सोपे होऊ शकते. शास्त्रज्ञांनी एक अशी नवीन पद्धत शोधली आहे, ज्यामुळे फक्त आवाजाच्या मदतीने कॅन्सर ओळखता येईल.
New cancer diagnosis method
New cancer diagnosis methodsaam tv
Published On
Summary
  • शरीर आजाराचे संकेत नेहमीच देत असते.

  • आता आवाज ऐकून कॅन्सरचे निदान होऊ शकते.

  • लॅरिंजियल कॅन्सरमध्ये आवाजात ठराविक बदल होतात.

आपल्याला कोणता आजार झाला असेल तर शरीर आपल्याला त्याचे संकेत देत असतं. अशावेळी समस्येची खात्री करण्यासाठी डॉक्टर आपल्याला तपासणी किंवा चाचण्या करण्याचा सल्ला देतात. आधी एखादा आजार झाला, की त्याची माहिती मिळवण्यासाठी अनेक चाचण्या, तपासण्या कराव्या लागत होत्या. पण आता तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. आजकाल मोबाईलवरसुद्धा काही आजारांची प्राथमिक माहिती मिळू शकते.

आता तर शास्त्रज्ञांनी एक नवी पद्धत शोधून काढली आहे. या पद्धतीचा कॅन्सरसाठी वापर फायदेशीर ठरणार आहे. या पद्धतीमध्ये फक्त आवाज ऐकून गळ्याच्या कॅन्सरचं निदान करता येणार आहे.

संशोधनातून काय आलंय समोर?

या संशोधनात आढळलं की, जर एखाद्या व्यक्तीला लॅरिंजियल कॅन्सर (Laryngeal Cancer) असेल तर त्याच्या आवाजाचा टोन, पिच आणि कंपनं यामध्ये ठराविक बदल होतात. हे बदल रुग्णाला स्वतः लक्षात येतीलच असं नाही, पण मशीन लर्निंग आणि एआय (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सूक्ष्म बदल ओळखता येतात.

New cancer diagnosis method
Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

या पद्धतीत रुग्णाचा आवाज रेकॉर्ड करून त्याचा सखोल विश्लेषण करण्यात येतं. आवाजाची गुणवत्ता, टोन आणि अगदी हलकंसं कंपनसुद्धा (voice modulation) मोजलं जातो. नंतर हा डेटा एआय मॉडेलमध्ये तपासला जातो आणि तो कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांच्या पॅटर्नशी जुळतो का, हे पाहिले जाते.

लॅरिंजियल कॅन्सर बहुतेक वेळा उशिरा ओळखला जातो. कारण सुरुवातीच्या टप्प्यात हलकी खरखर, आवाजात बदल किंवा बोलताना थोडा त्रास अशा लक्षणांकडे लोक साध्या सर्दी-खोकल्यासारखे समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे जातो, तेव्हा आजार बऱ्याच प्रमाणात वाढलेला असतो. पण जर सुरुवातीलाच आजार लक्षात आला तर उपचार सोपे आणि यशस्वी होतात.

New cancer diagnosis method
Symptoms of kidney failure: किडनी खराब झाल्यावर पायांमध्ये दिसून येणारे 3 मोठे बदल ओळखा; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

हा स्टडी अमेरिकेतील ओरेगन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये झाला आहे. संशोधकांनी कॅन्सरग्रस्त आणि निरोगी व्यक्तींच्या आवाजाचे डेटा गोळा केला. यानंतर कॅन्सरग्रस्तांमध्ये आवाजाच्या काही वैशिष्ट्यांमध्ये एकसारखे बदल दिसून आले.

New cancer diagnosis method
Health tests before joining gym: तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; जीममध्ये व्यायाम करण्यापूर्वी आरोग्याच्या 'या' टेस्ट करून घ्याच

शास्त्रज्ञांचे मत आहे की, हे तंत्रज्ञान फक्त गळ्याच्या कॅन्सरपुरती मर्यादित राहणार नाही. भविष्यात पार्किन्सन, व्होकल कॉर्ड डिसऑर्डर आणि आवाजाशी संबंधित इतर आरोग्य समस्यांमध्येही याचा वापर करता येणार आहे.

Q

गळ्याच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी कोणती नवीन पद्धत विकसित करण्यात आली आहे?

A

रुग्णाचा आवाज रेकॉर्ड करून एआयच्या मदतीने कॅन्सरचे निदान करणारी पद्धत विकसित करण्यात आली आहे.

Q

लॅरिंजियल कॅन्सरच्या रुग्णांच्या आवाजात कोणते बदल आढळतात?

A

आवाजाचा टोन, पिच आणि कंपनांमध्ये सूक्ष्म बदल आढळतात

Q

या संशोधनाची जागा कोठे आहे?

A

हे संशोधन अमेरिकेतील ओरेगन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आले.

Q

लॅरिंजियल कॅन्सर उशिरा का ओळखला जातो?

A

सुरुवातीची लक्षणे साध्या खोकल्यासारखी वाटल्यामुळे रुग्ण दुर्लक्ष करतात.

Q

भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या इतर आजारांमध्ये होऊ शकतो?

A

पार्किन्सन, व्होकल कॉर्ड डिसऑर्डर आणि आवाजाशी संबंधित आजारांमध्ये याचा वापर होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com