Peanut Butter Cookies Saam TV
लाईफस्टाईल

Peanut Butter Cookies Recipe: आता शाळा सुरू झाली, मुलांना टिफिनमध्ये काय द्याल? पीनट बटरपासून बनवा चवदार 'कुकीज'...

Peanut Butter Cookies Recipe In Marathi: मुलांच्या शाळेतील हलक्या फुलक्या भुकेसाठी रोज बिस्किटे द्यायची नसतील तर घरीच बनवा पीनट बटरपासून चवदार कुकीज. जाणून घ्या रेसिपी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Peanut Butter Cookies : आता जून महिना सुरु होताच सर्वत्र शाळांना देखील सुरुवात झाली आहे. शाळा म्हटलं की येतो, मुलांचा अभ्यास, शाळेत जायची तयारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचा टिफिन. प्रत्येक आईला रोज रोज मुलाचा टिफिनमध्ये काय द्यावे हा प्रश्न पडतो. आईला आपल्या मुलाला पोषण मिळेल आणि त्यांची भूक भागेल असेच पदार्थ डब्याला द्यायचे असतात. त्यामुळे ती नेहमीच एका नवीन पदार्थाचा शोधात असते.

चला तर मग आज जाणून घेऊयात मुलांच्या डब्यासाठी किंवा शाळेतील हलक्या फुलक्या भुकेसाठी घरीच बनवता येईल असा चवदार- गोड पदार्थ. लहान मुलांना बिस्कीट खायला खूप आवडतात. तर तुम्ही त्यांच्यासाठी घरीच पीनट बटरच्या साहाय्याने चविष्ट अशा कुकीज तयार करू शकता. जे खाऊन मुलांचे पोटही भरेल आणि त्यांच्या डब्यात एका नवीन पदार्थाचा समावेश देखील होईल.

कुकीज बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

तुम्ही घरबसल्या सहजसोप्या पद्धतीने मुलांना आवडतील अशा चवदार कुकीज बनवू शकता. यासाठी तुम्हाला पीनट बटर, प्रोटीन पावडर, मध, मॅपल सिरप, अंड , व्हॅनिला एसेंस, ड्राय फ्रूट्स आणि चॉकलेट चिप्स इत्यादी साहित्य लागतील.

कुकीज बनवण्याची कृती :

कुकीज बनवण्याआधी एकीकडे ओव्हन 350°F वर गरम करायला ठेवा. दुसरीकडे एका भांड्यात पीनट बटर, प्रोटीन पावडर, मध, मॅपल सिरप, व्हॅनिला एसेंस आणि अंडी घालून सर्व मिश्रण छान एकत्र फेटून घ्या. घट्टसर पीठ तयार झाल्यास त्यामध्ये ड्राय फ्रूट्स आणि चॉकलेट चिप्स घालून सर्व मिश्रण करून घ्या. आता एका बेकिंग शीटवर बटर पेपर घालून त्यावर तयार केलेले पीनट बटर चे सारण कुकी स्कूपच्या मदतीने पसरवा. हा ट्रे ओव्हनमध्ये १५-२० मिनिटे ठेवून कुकीज छान बेक करून घ्या. कुकीज हलक्या सोनेरी रंगाच्या झाल्या की ओव्हनमधून बाहेर काढा. अशाप्रकारे तुमच्या स्वादिष्ट कुकीज तयार झाल्या आहेत. दीर्घकाळ यांचा आस्वाद घेण्यासाठी कुकीज हवाबंद डब्यात स्टोर करा. या चवदार कुकीज आपल्या मुलांनच्या डब्यात तुम्ही देऊ शकता. मुले देखील खूप खुश होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT