Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि यशाचा मार्ग दाखवणारे उत्तम मार्गदर्शक होते. त्यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींवर अभ्यास केला पाहिजे सोप्या पद्धतीने सांगितले आहे.
काळ म्हणजे वेळ काय सांगते हे समजून घ्यायला शिका. सध्या बाजारात काय ट्रेंड आहे? कोणत्या क्षेत्राला मागणी आहे? टेक्नॉलॉजी, व्यवसाय आणि नोकरीच्या संधींचा अभ्यास करून निर्णय घ्या.
“कानि मित्राणि” म्हणजे तुमचे खरे साथीदार कोण आहेत हे ओळखा, स्वार्थासाठी जवळ येणाऱ्या लोकांपासून सावध राहा. तुमच्या वाईट काळात साथ देणारेच खरे मित्र असतात.
“को देश:” म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता किंवा काम करता, त्या ठिकाणच्या संधी, वातावरण आणि विकासाची दिशा तपासा. याने तुम्हाला कोणत्या ठिकाणी किती मेहनत घेतली पाहिजे याची स्पष्टता मिळते.
“कौ व्ययागमौ” म्हणजे कमाईपेक्षा जास्त खर्च केल्यावर पैशाच्या अडचणी वाढतात. बजेट तयार करा, बचत वाढवा आणि अनावश्यक खर्च टाळा.
“कस्याऽडं का च मे शक्तिरिति” म्हणजे आपली क्षमता आणि कौशल्य ओळखा. ज्या क्षेत्रात तुम्ही सक्षम आहात, त्याच दिशेने प्रयत्न करा. ताकदीवर विश्वास ठेवा आणि कमकुवत बाजूंवर काम करा.
“इति चिन्त्यं मुहुर्मुहु:” म्हणजे कोणताही निर्णय एकदाच विचार करून घेऊ नका. वारंवार चिंतन करा. परिस्थिती बदलत असते, त्यामुळे विचारसरणीही बदलायला हवी.
दररोज स्वतःचं मूल्यांकन करा. वेळ, मित्र, आर्थिक स्थिती आणि स्वतःची प्रगती यावर लक्ष ठेवा. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मपरीक्षण यामुळेच यश निश्चित होते.