Foreign Minister S. Jaishankar  
लाईफस्टाईल

Passport: पासपोर्ट बनवणे होणार सोपे; व्हेरिफिकेशनवेळी नाही चालणार पोलिसांची 'दादागिरी'

Bharat Jadhav

पासपोर्ट मिळवणे आता सोपे होणार आहे. ही प्रक्रिया सोपी आणि सरळ व्हावी यासाठी परराष्ट्र मंत्रालय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांच्या सहकार्याने उपाय शोधत आहे. ज्यामुळे नागरिकांना सोप्या पद्धतीने पासपोर्ट मिळेल. पासपोर्ट सेवेसाठी मंत्रालयाने 440 पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्रे स्थापन केल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. ते पासपोर्ट सेवा दिनानिमित्त माध्यमांशी बोलत होते.

पासपोर्टसंदर्भात अधिक माहिती देताना जयशंकर म्हणाले ९३ पासपोर्ट सेवा केंद्रे आहेत. सध्या देशात ५३३ पासपोर्ट प्रक्रिया केंद्रे आणि ३७ प्रादेशिक पासपोर्ट कार्यालये आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने विदेशातील १८७ भारतीय मिशन्सनाही त्याच्याशी जोडले आहे. पासपोर्ट काढण्यात सर्वात मोठी अडचण येत ती म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशनच्या वेळी. अनेक वेळा पोलीस व्हेरिफिकेशनच्या नावाखाली अर्जदारांची छळवणूक करतात. हीच समस्या परराष्ट्र मंत्रालय हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

पोलीस व्हेरिफिकेशनला गती देण्यासाठी 'mPassport पोलीस ॲप' सुरू करण्यात आलंय. यासह २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची ९ हजार पोलीस ठाणी जोडली गेलीत. यासोबतच कागदविरहित कागदपत्रांसाठी पासपोर्ट सेवा प्रणाली डीजी लॉकरशी जोडण्यात आलीय. त्यामुळे पोलीस पडताळणीचे काम सोपे होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिलीय.

परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या वर्षी २००३ मध्ये १.६५ कोटी पासपोर्ट संबंधित सेवा दिल्या. २०२३ मध्ये मासिक पासपोर्ट अर्जांची संख्या १४ लाखांवर गेली होती.पासपोर्टचा नागरिकांच्या विकासात मोठा वाटा आहे. याचा थेट परिणाम देशाच्या विकासावर होतो, असं परराष्ट्र मंत्री म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT