Parenting Tips, How To Build Your Child Confidence Saam tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकांनो, मुलांना स्मार्ट आणि आत्मविश्वासू बनवायचे आहे? या टीप्स फॉलो करा

How To Build Your Child Confidence : वाढत्या वयात मुलांना अधिक हुशार आणि आत्मविश्वासू कसे बनवायचे असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतो. पण आम्ही काही टीप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही मुलांना आत्मविश्वासू बनवू शकता.

कोमल दामुद्रे

Child Care Tips :

मुलं जन्माला आल्यानंतर घरात आनंद असतो. वाढत्या वयात मुलांना चांगले वळण लागायला हवे असे प्रत्येक पालकाला वाटते. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते अधिक प्रयत्न देखील करतात.

हल्लीच्या जीवनशैलीत (Lifestyle) कामाच्या व्यापामुळे पालकांना मुलांची व्यवस्थित काळजी घेता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर योग्य संस्कार कसे करता येईल याचा विचार ते करतात. तसेच वाढत्या वयात मुलांना अधिक हुशार आणि आत्मविश्वासू कसे बनवायचे असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतो. पण आम्ही काही टीप्स (Tips) सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही मुलांना आत्मविश्वासू बनवू शकता.

1. सकारात्मक राहा

वाढत्या वयात मुलांना अनेक नवीन गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळतात. अशावेळी त्यांना अधिक सकारात्मक राहायला सांगा. तसेच आपल्या मुलांना (Child) सकारात्मक राहाण्याची प्रेरणा द्या. त्यांची कोणतीही कृती अयशस्वी झाली तरी त्यांना प्रोत्साहन द्या.

2. स्वावलंबी बनवा

मुलांना वाढत्या वयात स्वावलंबी बनवा. त्यांना स्वत:ची कामे स्वत: करायला शिकवा. स्वत:चे आत्मपरिक्षण करायला सांगा. तसेच त्यांची विचार शक्ती समजून घेण्याचा प्रयत्न देखील करा.

3. निर्णय घेण्याची क्षमता

मुलांना स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ द्या. पण निर्णय चुकत असेल तर त्याविषयी समजावून सांगा. भविष्यात ते स्वत:चे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतील, तसेच यामुळे चांगले आणि वाईट यातील फरकही त्यांना कळेल.

4. प्रोत्साहन द्या

पालकांनी मुलांच्या भावना समजून घ्यायला हव्या. तसेच त्यांच्या भावनेला प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांची आवड कोणत्या गोष्टीत अधिक आहे हे समजून घेऊन पालकांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवायला हव्या.

5. लक्ष केंद्रित करायला सांगा

जर मुलांना अभ्यासात यश हवे असेल तर त्यांना लक्ष केंद्रित करायला शिकवा. तसेच मुलांपासून ताण-तणाव दूर ठेवा. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा

SCROLL FOR NEXT