Parenting Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलाचं भवितव्य धोक्यात जाण्याआधीच पालकांनो सावध व्हा; लहानपणापासूनच शिकवा 'या' गोष्टी

Child Care : पालक मुलांचा पहिला आणि खरा शिक्षक असतो. त्यामुळे पालकांनी लहान वयापासूनच मुलांना 'या' गोष्टी सांगा. त्यामुळे मुलांच्या चांगला व्यक्तिमत्व विकास होईल.

Shreya Maskar

आजकालच्या धावपळीच्या जगात पालकांना मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. पालक आपल्या सोयीनुसार मुलांना वेळ देतात. पण हे चुकीचे आहे. लहान वयात मुलांवर चांगले संस्कार करणे त्यांना चार हिताच्या गोष्टी सांगणे पालकांचे कर्तव्य आहे. कारण बालपण मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. कामात कितीही व्यस्थ असलात तरी मुलांसाठी आवर्जून वेळ काढा आणि 'या' गोष्टी समजवून सांगा. भविष्यात तुमची मुलं आत्मनिर्भर होण्यासोबतच एक छान माणूस म्हणून समाजात घडतील.

स्वतःची कामे स्वतः करा

मुलांना समजायला लागल्यापासून त्यांच्यामध्ये थोडे थोडे बदल करणे महत्वाचे आहे. त्यांना लहानपणापासूनच स्वतःची कामे स्वतः करायला सांगा. पालकांच्या अति लाडामुळे मुले त्यांच्यावर अवलंबून राहायला लागतात. त्यामुळे मुलांना मोठे झाल्यावर स्वावलंबी होणे थोडे जड जाते. शाळेच्या तयारी पासून जेवणाचे शिष्टाचार त्यांना समजावून सांगा आणि त्यांची कामे त्यांना करू द्या.

कष्टाचे महत्त्व

लहानपणी आई वडील मुलांच्या प्रत्येक इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करतात. म्हणून कधीकधी मुलांना त्याची कदर राहत नाही. आपल्याला सर्व गोष्टी पटकन मिळतात आणि पुढेही मिळत राहतील असा त्यांचा समज होतो. त्यामुळे वेळेवर पालकांनी मुलांना कष्ट करून मिळवलेल्या गोष्टींचे महत्त्व पटवून द्यावे. म्हणजे भविष्यातील समस्यांसाठी ते परफेक्ट तयार होतील.

लक्झरी जीवनशैली

मुलांना लहान वयापासून फॅन्सी आणि महागड्या वस्तू वापरण्याची सवय लावू नका. उलट त्यांचे मन घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्ये रमवा. त्यांना नवीन छंद जोपासायला आणि नवीन गोष्टी करायला प्रोत्साहन द्या.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर टाळा

आजकाल बरेच पालक मुलांनी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून त्यांचे मन गुंतून ठेवण्यासाठी त्यांना महागडे मोबाईल, स्मार्टवॉच आणि गेम विकत घेऊन देतात. पण यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आणते. जास्त वेळ स्क्रीन पाहिल्यास मुलांना लहान वयातच डोळ्यांच्या समस्या निमार्ण होतात. ते हळूहळू एकलकोंडे बनत जातात. बाहेरील जगाचा त्यांना विसर पडतो.

प्रसंगावधानाचे महत्त्व

एखादी आपत्कालीन परिस्थितीत आल्यास स्वतःसोबत इतरांचा बचाव कसा करता येईल याचे ज्ञान पालकांनी देणे महत्त्वाचे आहे. घरात मुलगी असेल तर तिला लहानपणापासून सेफ डिफेंस ट्रेनिंग द्या. प्रसंगावधानाचे महत्त्व पटवून द्या.

पालकांची वर्तणूक

पालकांनी लहान वयात आपल्या मुलांना मोठ्यांचा आदर आणि लहानांना सांभाळून घ्यायला शिकवा. सर्वात महत्त्वाचे मुलांसमोर पालकांनी कधीही भांडू नये. कारण याचा डायरेक्ट परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर पालकांची वर्तणूक चांगला ठेवावी.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT