Parenting Tips Saam tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलांसमोर या गोष्टी पालकांनी चुकूनही करु नका, किशोरवयीन वयात बिघडतात मुलं

Parent Teenager Relationship : बरेचदा पालकांकडून न कळत अशा चुका होतात ज्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Mistakes Parents Make With Teens :

वाढत्या वयात मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. असे म्हटले जाते की, बालवयात मुलांचे मन अतिशय कोवळे असते. जसा त्याला आकार मिळेल तसे ते घडतात. यासाठी पालकांनी या वयात मुलांची काळजी घ्यायला हवी.

किशोर वयात आलेली मुलं कसे वागतात? कसे बोलतात? काय विचार करतात? याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. पालक जी शिकवण मुलांना देतात, संस्कार देतात ते मुलांच्या वागणुकीतून दिसतात. पालकांचे वागणं आणि घरातील वातावरणात मुले अधिक प्रमाणात शिकतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासाठी पालकांनी (Parents) मुलांसमोर वागताना किंवा बोलताना भान ठेवायला हवे. मुलांसमोर कोणत्याही गोष्टी करताना विचार करणे आवश्यक आहे. बरेचदा पालकांकडून न कळत अशा चुका होतात ज्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर (Mental Health) परिणाम होतो. जाणून घेऊया त्याबद्दल

1. भावनांना कसे हातळतो?

बरेचदा कामाच्या व्यापामुळे पालक अधिक तणावग्रस्त होतात. अशावेळी मुलांसमोर ते संयमाने परिस्थिती हाताळतात. जी मुलांना पटकन समजून येते.

2. कामाची जबाबदारी

कोणते काम करताना तुम्ही ते किती प्रामाणिकपणे करत आहात याबद्दल मुलं विचार करतात. यामुळे तुमची कामाबद्दलची प्रतिष्ठा मुलांना (Child) कळते. त्यामुळे ते देखील त्या पद्धतीने वागू लागतात.

3. कुटुंबासोबत कसे वागतात?

तुमच्या तुमच्या जोडीदारासोबत कसे वागता. मोठ्यांचा आदर कशाप्रकारे करता यावर सारं काही अवलंबून असते. तुम्ही जर इतरांचा आदर करत असाल तर मुले देखील त्यांचा आदर करतात.

4. भेदभाव करणाऱ्या गोष्टी

अनेकदा पालक मुलांसमोर भेदभाव करतात. ज्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. बरेचदा हे काम स्त्रीचे आणि ते काम पुरुषांचे असा देखील घरात वारंवार विषय निघतो. त्यामुळे त्यांना कोणतेही काम सांगितल्यावर ते देखील भेदभाव करु लागतात. त्यांचा मनात आणि डोक्यात या विषयीचे विचार सुरुच असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT