Parenting Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकांच्या या वाईट सवयी कमी करतात मुलांचा आत्मविश्वास, तुम्हीदेखील ही चुक करत नाही ना?

Bad habits of parents harm their children : अनेकदा जाणूनबुजून किंवा नकळत पालक अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्याऐवजी कमी होतो. जाणून घेऊया मुलांचे संगोपन करताना पालकांनी कोणत्या चुका टाळाल्या पाहिजेत.

कोमल दामुद्रे

Effects Of Teasing kids :

वाढत्या वयानुसार मुलांमध्ये आत्मविश्वास येऊ लागतो. प्रत्येक पालकाला असे वाटते की, आपल्या मुलांने आत्मविश्वासू बनायला हवे. कोणतेही काम करताना त्याने न घाबरता त्या गोष्टी करायला हव्या.

मुलांनी (Kids) आत्मविश्वासाने जीवनातील प्रत्येक आव्हानावर मात करायला हवी. तसेच यशाचा मार्ग देखील निवडावा असे प्रत्येक पालकांचे (Parents) मत असते. त्यासाठी मुले मेहनतही घेतात. परंतु, अनेकदा जाणूनबुजून किंवा नकळत पालक अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्याऐवजी कमी होतो. जाणून घेऊया मुलांचे संगोपन करताना पालकांनी कोणत्या चुका टाळाल्या पाहिजेत.

1. शारीरिक रचना

मुलांना पालकांसोबत अधिक चांगले व सोयीस्कर वाटते. यामुळे गमतीतही मुलांना वाईट बोलू नका. त्याच्या मित्रांसमोर (Friend) किंवा इतरांसमोर रंग, उंची, वजन किंवा त्यांच्या दिसण्यावर नकारात्मक पद्धतीने बोलू नका. यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो.

2. अभ्यास करताना टोमणे मारणे

आपल्या मुलांना त्यांच्या अभ्यासाबद्दल टोमणे मारु नका. असे केल्याने मुलांचे मनोबल खचू शकते. तसेच मुलांची इतर मुलांसोबत तुलना करु नका, त्यांना चिडवून निराश करुन त्यांची प्रगती थांबू शकते. तसेच त्यांच्या बालमनावर परिणाम होऊ शकतो.

3. इमोशनल करु नका

तुमच्या बोलण्यामुळे किंवा टोमणे मारल्यामुळे मुल रडतात त्यावर आपण तु मुलगा आहे मुलीसारखे रडू नको असे अनेकदा म्हणतो. त्यासाठी पालकांनी अशी विधाने टाळा. वय कोणतेही असले तरी मुलांना या पद्धतीने प्रोत्साहन देऊ नका.

4. खाण्यापिण्यावरुन सतत बोलणे

आपले मुल लठ्ठ होईल या भीतीने बरेच पालक आपल्या मुलांना खाण्यापिण्याच्या बाबतीत सतत टोकत असतात. वाढत्या वयात मुले अधिक प्रमाणात खेळतात, उड्या मारतात त्यामुळे त्यांना वारंवार भूक लागते. अशावेळी त्यांच्यावर रागवण्यापेक्षा त्यांना सकस आहार खाण्यास द्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT