Parenting Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : तुमची मुलं अनेक गोष्टींना घाबरतात? या 5 गोष्टी करा मुलांमधील आत्मविश्वास वाढेल

Shraddha Thik

Parenting Tips For Children :

बालपण प्रत्येकासाठी खास असते. अशा स्थितीत त्यांना योग्य संगोपन आणि चांगले वातावरण देण्याची जबाबदारी पालकांची असते. लोकांशी कसे बोलायचे आणि समाजात कसे वागायचे, हे मूल प्रथम त्याच्या पालकांकडूनच शिकतो. त्यांच्या पालकांना पाहून मुले लोकांशी संवाद साधण्यास शिकतात आणि ते जीवनात व्यावहारिक आणि सामाजिक बनतात, परंतु बऱ्याच पालकांची समस्या ही आहे की त्यांच्या मुलांचा आत्मविश्वास (Confidence) कमी होत आहे आणि ते लोकांशी बोलू किंवा भेटण्यास देखील असमर्थ आहेत.

किड्स हेल्थ नुसार, जेव्हा एखाद्या मुलाकडे सकारात्मक लक्ष, भरपूर प्रेम आणि काळजी मिळते तेव्हा त्या मुला मधला सुरक्षित, प्रेमळपणा आणि आत्मविश्वास आपोआप वाढतो. जेव्हा पालक (Parents) मुलांकडे लक्ष देतात तेव्हा मुलांमधला स्वत:बद्दलचा विश्वासही वाढतो.

या गोष्टींनी मुलांचा आत्मविश्वास वाढवा

मुलांना वेळ द्या

मुलांना त्यांच्या पालकांच्या सहवासाची गरज आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. त्यामुळे मुलांसाठी वेळ काढा आणि त्यांच्यासोबत हसत-खेळत वेळ घालवा.

तुमचे एकमेकांशी असलेले नाते सुधारा

मुलांबद्दल नेहमी तक्रार करणे टाळा. त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करा आणि नाते गोड करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुमच्यातील संबंध चांगले असतील, तेव्हा तुम्ही त्यांना चांगल्या मार्गाने मार्गदर्शन करू शकाल.

तुलना टाळा

तुमच्या मुलांची इतर कोणाशीही तुलना करू नका. प्रत्येक मूल अद्वितीय आहे आणि प्रत्येकामध्ये काही दोष आणि सामर्थ्य आहेत. तुलना केल्यास मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

स्तुती करा

जर मुलाने काही चांगले केले तर त्याची भरपूर स्तुती करा. बरेच पालक आपल्या मुलांबद्दल खूप तक्रार करतात पण ते जे काही चांगले करतात त्याबद्दल फुशारकी मारत नाहीत. त्यामुळे त्यांचे मनोबल कमी होते.

सहलीला जा

मुलांसोबत काही शैक्षणिक आणि मजेदार सहली करा. दिवस एकत्र घालवा आणि त्यांच्यासोबत संस्मरणीय अनुभव तयार करा. असे केल्याने ते तुमच्याकडून बरेच काही शिकू शकतील आणि लोकांना भेटू शकतील किंवा सामाजिक बनू शकतील. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकली?

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

SCROLL FOR NEXT