Drinking Excess Water Becomes Dangerous  Freepik
लाईफस्टाईल

Water Toxicity : अति प्रमाणात पाणी पिणे ठरू शकते आरोग्यासाठी विष, वाचा

Drinking Excess Water Becomes Dangerous : अति प्रमाणात पाणी पिणं हे आरोग्यास अपायकारक ठरू शकतं. इलेक्ट्रोलाइट बिघाड, मूत्रपिंडावर ताण अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. योग्य प्रमाणात पाणी प्या, सावध राहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या शरीरात सुमारे ५५ ते ७५ टक्के पाणी असतं. पाणी म्हणजे आपल्या जीवनाचे अमृत आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यापासुन शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याच्या कार्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. डॉक्टरसुद्धा नेहमी पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देतात. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. पण अति प्रमाणात पाणी पिल्यास शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते व हेच अमृत आरोग्यासाठी विषही ठरू शकते.

सामान्यत: आपल्या शरीराला दररोज दिड ते दोन लीटर पाण्याची आवश्यकता असते. काही लोक जास्त पाणी पिल्यास जास्त फायदे मिळतील असे समजून अति प्रमाणात पाणी पितात. परिणामी ते शरीरासाठी योग्य ठरत नाही. शरीरात पाण्याची पातळी वाढल्यास रक्तातील सोडियमची पातळी कमी होते. यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये पाणी जमा होते व त्यांना सुज येते. सुज आल्याने डोकेदुखी, चक्कर येणे आणि मानसिक अस्थिरता अशा समस्या उद्भवू शकतात.

जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास मळमळ आणि उलट्या देखील होऊ शकतात. शरीरातील पाण्याच्या मदतीने किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करते. अशात जास्त प्रमाणात पाणी असल्यास किडनीवर ताण पडू शकतो. आणि किडनीचे कार्य मंदावल्यामुळे किडनीसंबंधीत समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच जास्त पाण्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडल्यामुळे स्नायुंवर परिणाम होतो. युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या मते काहीवेळा गंभीर प्रकरणांत अति प्रमाणात पाणी पिल्यास कोमा किंवा मृत्यूही होऊ शकतो.

यापासुन वाचण्यासाठी नियमाप्रमाणे दिवसभरात दिड ते दोन लीटर पाणी प्या. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे टाळा. जर तुमची लघवी फिकट पिवळी किंवा पारदर्शक असेल, तर तुम्ही पुरेसे पाणी पित आहात. जास्त पाणी प्यायल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी योग्य आहार घ्या. तसेच जर तुम्हाला जास्त पाणी पिण्याची सवय असेल आणि तुम्हाला याचे दुष्परिणाम जाणवत असतील तर लगेचच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडच्या वकिलांची हायकोर्टात धाव,रीट पिटीशन दाखल

Reels Addiction: तुम्हालाही सतत रील्स पाहायची सवय आहे? सोडवण्यासाठी 'या' टिप्स वापरा

Politics : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! सहकाऱ्यांशी खटकलं, नेत्याची सटकली; बैठकीतून बाहेर येताच पदाचा राजीनामा

Khan Sir: खान सर पुन्हा चर्चेत! श्रावणी सोमवारी घेतला हा मोठा निर्णय|VIDEO

Mumbai Crime : चेंबूरमध्ये थरार! फक्त १,००० रुपयांसाठी ४४ वर्षीय बॅडमिंटन कोचवर जीवघेणा हल्ला, बिअर बाटली फोडली अन्...

SCROLL FOR NEXT