Overweight Disease  Saam Tv
लाईफस्टाईल

Overweight Disease : सावधान! वाढत्या कंबरेच्या घेरामुळे जडू शकतो हा गंभीर आजार, डॉक्टरांनी दिला इशारा

Belly Fat :आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे वजनही वाढते आहे. त्यामुळे अनेकांना इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

कोमल दामुद्रे

High Waistline : आजकाल वाढत्या वजनामुळे सगळेच त्रस्त आहेत. जगातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे वजन वाढण्याच्या समस्येशी झुंजत आहे. बदलेल्या जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याच्या सवयी बदलत जात आहे. आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे वजनही वाढते आहे. त्यामुळे अनेकांना इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

वाढत्या वजनामुळे आपल्याला हृदयविकाराचा (Heart attack) धोका देखील जडू शकतो. हृदयविकाराच्या आजाराबद्दल आपण अनेकदा ऐकतो पण तुम्ही कधी ऐकले आहे का की वाढत्या कंबरेच्या घेरामुळे आपले हृदय कमकुवत होऊ शकते.

द मिररच्या मते, यूकेच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, कंबरच्या प्रत्येक इंच वाढीसाठी हृदयविकाराचा धोका 10 ते 11 टक्क्यांनी वाढतो. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे असे म्हणणे आहे की, 430,000 लोकांचा अभ्यास केला आणि त्यांनी पोटाच्या वाढत्या चरबीला कमी करण्याला प्राधान्य दिले. असे 40 ते 70 वर्षे वयोगटातील लोकांच्या बॉडी मास इंडेक्ससाठी लठ्ठपणा (Overweight) हा सर्वात मोठा धोका घटक आहे.

मागील 13 वर्षांच्या अभ्यासात असे समोर आले आहे की, कंबरेच्या प्रत्येक इंचासाठी शरीरात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 4 टक्क्यांनी अधिक पटीने वाढतो. तज्ज्ञांचे मत असे आहे की, जर लोकांच्या शरीरात चरबी जमा होत असेल तर त्यांनी शरीरातील चरबी काढून टाकण्यासाठी योग्य लक्ष दिले पाहिजे.

प्रमुख संशोधक डॉ. अयोदिपुपो ओगुनताडे यांच्या मते, "व्हिसेरल फॅटमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (Disease) होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही चरबी शरीरासाठी धोकादायक असतात.

नॅशनल ओबेसिटी फोरमचे अध्यक्ष, टॅम फ्राय म्हणाले, जर तुम्ही लठ्ठ आहात असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या घरात कंबर मोजणारी टेप असावी. जर ही टेप तुमच्या कमरेभोवती चपखल बसली असेल, तर तुमचे वजन योग्य आहे. नाही, तर चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होऊ शकतो.

ऑक्सफर्ड अभ्यासात असेही दिसून आले आहे की बीएमआयच्या वाढत्या युनिटमुळे हृदयविकाराची शक्यता 9% वाढली आहे. त्यामुळे हृदयाला रक्त पंप पुरेशा प्रमाणात मिळणार नाही. तसेच यामध्ये वर्कआउट केल्यानंतर श्वास घेण्यास त्रास, थकवा जाणवणे, सतत चक्कर येणे आणि गुडघे व पाय सुजणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. कंबर मोजण्याचा योग्य मार्ग म्हणजे नाभीच्या वर सुमारे एक इंच मोजणे.

जपानमध्ये तर 40 ते 74 वयोगटातील कोणत्याही कर्मचाराच्या कंबरेची नोंद ठेवली जाते. येथे राज्याने पुरुषांची कंबर ३३.५ इंच निश्चित केली आहे. श्री फ्राय यांनी सांगितले की हा जपानमधील एक कायदा आहे जो दरवर्षी संपूर्ण जनतेद्वारे स्वीकारला जातो.

अधिक चरबी हे कंबरेच्या आकारात वाढ होण्याचे लक्षण असू शकते, जी शरीरात साचते आणि हृदय व रक्तवाहिन्यांच्या कार्य बिघडवते. हृदयविकाराची समस्या ही एक जुनाट समस्या आहे जी कालांतराने हळूहळू वाढत जाते. या सर्व अभ्यासातून असे दिसून आले आहे की वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.ज्या लोकांचे वजन जास्त आहे त्यांना उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि टाइप 2 मधुमेहाची समस्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शाळांची दयनीय अवस्था

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT