नवीन व्यवसाय सुरू कराल, भाऊबीजेला नातेबंध आणखी पक्के होईल; ५ राशींच्या लोकांसाठी स्मरणात राहणारा दिवस ठरणार

Thursday horoscope in Marathi : काही राशींचे लोक नवीन व्यवसाय सुरू करतील. तर काहींचे नातेबंध आणखी पक्के होईल. वाचा गुरुवारचं राशीभविष्य
horoscope in marathi
Horoscope In MarathiSaam tv
Published On

पंचांग

गुरुवार,२३ ऑक्टोबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष,यम द्वितीया(भाऊबीज)

तिथी-द्वितीया २२|४७

नक्षत्र-विशाखा

रास-तुला २२|०६ नं. वृश्चिक

योग-आयुष्मान

करण-बालव

दिनविशेष-आनंदी दिवस

मेष - मोठ्या प्रवासाचे बेत आखाल. व्यवसायामध्ये चांगली घोडदौड होईल. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस सुदिन आहे म्हणायला हरकत नाही. दिवस चांगला आहे.

वृषभ - आजोळी प्रेम वाढेल. नातेवाईकांच्याकडे विशेषतः मामाकडे जाण्याचे योग आहेत. त्यांच्यापासून काही धनलाभाची शक्यता आहे. शत्रूंचा त्रास वाढेल. दिवस संमिश्र आहे. तब्येत जपावी.

मिथुन - विष्णू उपासना फलदायी ठरेल. विद्यार्थ्यांना नवीन शिकण्यासाठी चांगल्या काही गोष्टी संधी घेऊन आलेला दिवस आहे. सृजनशीलता वाढेल.Extra curricular activities मध्ये व्यस्त रहाल.

horoscope in marathi
Vastu Tips: किचनमध्ये भांडी किंवा अन्न सतत खाली पडतंय? या संकेताकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

कर्क - घरगुती आनंद द्विगुणीत होईल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. यंदाची भाऊबीज विशेष स्मरणात राहील. कुटुंबीयांच्या बरोबर खेळीमेळीच्या वातावरणात सण साजरा होईल. वाहन योगाला दिवस उत्तम आहे.

सिंह - बहिण भावाचे अतूट नाते आज आपल्या राशीला विशेषत्वाने शुभ फलित देण्यासाठी आलेले आहे. आपल्या भावंडांच्या पराक्रमावर तुम्ही खुश होऊन जाल. नातेबंध पक्के होण्यासाठी दोघांकडून प्रयत्न होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कन्या - खऱ्या अर्थाने सणांमध्ये आपल्या लोकांचे महत्त्व आपल्याला समजत असते. कुटुंबीयांमध्ये एक प्रकारचे कनेक्शन आज तुमच्या राशीला जाणवेल. त्यामुळे कामासाठी नव्याने हुरूप येईल. धनाशी निगडित गोष्टींचे योग्य निर्णय आज लागणार आहेत.

horoscope in marathi
Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

तूळ - आनंदी राहण्यासाठी खरे तर आपल्या राशीला विशेष काही कारण लागत नाही आणि आज भाऊबीजेसारखा सण. मनामध्ये भावंडांविषयी प्रेम असणारी आपली रास आहे. याचा आनंद वाढीव करण्यासाठी प्रयत्न कराल आणि सुरुवात स्वतःपासून असेल.

वृश्चिक - एक सुख येण्यासाठी आपल्याला दोन आपल्या राशीला दोन दुःख घ्यावी लागतात. आज याची पुन्हा एकदा प्रचिती येईल. विनाकारण अडचणींचा सामना करून पुढे जावे लागेल. खर्चाला मात्र धरबंद राहणार नाही. तरीसुद्धा सण आहे म्हणून सगळ्या गोष्टी तुम्ही सकारात्मक रित्या पार पाडाल.

धनु - एखाद्या नवीन गोष्टीचा सामना करण्यासाठी पदर खोचून तयार राहाल. मात्र केलेल्या गोष्टींचे अनेक लाभ तुम्हाला होणार आहेत. गुंतवणुकीतून फायदा, त्याचबरोबर संततीशी योग्य प्रकारे वार्तालाप होतील .

horoscope in marathi
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हत्तीची मूर्ती असावी की नाही?

मकर - कष्ट आणि मेहनतीला आपल्या राशीला कधीच पर्याय नसतो. मग त्यासाठी सण असो इतर कुठलेही धार्मिक गोष्टी असो. कामाला प्राधान्य देणारी आपली रास आणि याचे उत्तम फलितही आज मिळेल. समाजामध्ये मान सन्मान वाढेल.

कुंभ - शिव उपासना आज फलदायी ठरेल. मनाचा कुंभ भरलेला असेल. देवदर्शनासाठी आतुरता निर्माण होईल. अर्थात सजग वृत्तीने सर्व गोष्टी कराल. मोठे प्रवास होतील.

मीन - एखादी गोष्ट ठरवली आहे आणि त्या सहज होईल असे वाटत नाही. "नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न" असा काहीसा आज दिवस आहे. मात्र यातून तावून सुलाखून निघाल आणि यशाचे झेंडा नक्की रोवाल. दिवस संमिश्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com