Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अ‍ॅसिडिटीपासून आराम कसा मिळवायचा?

अ‍ॅसिडिटी ही एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे अनेकांना त्रास होतो. ही समस्या बऱ्याचदा खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवते.

Acidity | yandex

पुदिन्याचा चहा

पुदीना पोटाच्या स्नायूंना आराम देते आणि पचनास मदत करते. जेवणानंतर पुदिन्याचा चहा प्यायल्याने छातीत जळजळ आणि पोटात जडपणा कमी होण्यास मदत होते.

Acidity | freepik

आलं

आल्यामुळे पोटातील अ‍ॅसिडिटी कमी होते. दररोज चहामध्ये मिसळून सेवन केल्याने किंवा कच्चे आलं चोखल्याने छातीत जळजळ कमी होण्यास मदत होते.

Acidity | yandex

जवस

जवस पोटाला आराम देते आणि आम्लता नियंत्रित करते. पाण्यात भिजवून किंवा दह्यासोबत खाल्ल्याने पचन सुधारते आणि छातीत जळजळ कमी होते.

Acidity | google

हलका व्यायाम आणि योगासने

तुमच्या पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी, दररोज हलके चालणे किंवा योगा करा. यामुळे पचन सुधारण्यास मदत होते.

Acidity | freepik

हलके आणि संतुलित जेवण

जड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ अॅसिडिटी वाढवू शकतात. दिवसातून ५-६ वेळा लहान, हलके जेवण खा.

Acidity | Canva

कोमट लिंबू पाणी

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने पोटाचा पीएच संतुलित होतो, अ‍ॅसिडिटी कमी होते आणि पचन सुधारते.

Acidity | Canva

NEXT: तुमच्या सकाळच्या 'या' सवयीमुळे किडनी होईल खराब, आजच टाळा

Kidney | yandex
येथे क्लिक करा