Kidney: तुमच्या सकाळच्या 'या' सवयीमुळे किडनी होईल खराब, आजच टाळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

किडनी

किडनी हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. हे शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकतात. कोणत्या सवयींमुळे किडनी खराब होऊ शकते, जाणून घ्या.

Kidney | Saam Tv

नाश्ता न करणे

नाश्ता न केल्याने मेटाबॉलिजम रेटवर नकारात्मक परिणाम होतो आणि शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Kidney | yandex

जास्त मीठ खाणे

जे लोक नाश्त्यात जास्त खारट अन्न, प्रक्रिया केलेले अन्न, पॅकेज्ड ज्यूस किंवा लोणचे इत्यादी खातात, त्यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते आणि तुमच्या किडनी खराब होऊ शकतात.

Kidney | yandex

पाणी न पिणे

जर तुम्ही सकाळी पाणी प्यायले नाही तर तुमचे शरीर डिहायड्रेट होऊ शकते आणि त्यामुळे तुमचे रक्त घट्ट होऊ शकते. घट्ट रक्तामुळे किडनीला जास्त काम कावे लागते.

Kidney | yandex

लघवी रोखून ठेवणे

जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने तुमच्या किडनीला नुकसान होऊ शकते आणि यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकतो.

Kidney | freepik

रिकाम्या पोटी चहा पिणे

रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने शरीर डिहायड्रेटेड होते, ज्यामुळे किडनीला जास्त काम करावे लागते.

Kidney | yandex

NEXT: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे पूर्ण नाव माहितीये का?

asrani | google
येथे क्लिक करा